मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG: मी जो रूट असतो तर.... सुनील गावसकरांनी दिला इंग्लंडच्या टीमला सल्ला

IND vs ENG: मी जो रूट असतो तर.... सुनील गावसकरांनी दिला इंग्लंडच्या टीमला सल्ला

इंग्लंडच्या टीमसमोर ही सीरिज वाचवण्याचं आव्हान आहे. टीम इंडियाचे माजी कॅप्टन सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी यावेळी इंग्लंडचा कॅप्टन जो रूटला (Joe Root) एक सल्ला दिला आहे.

इंग्लंडच्या टीमसमोर ही सीरिज वाचवण्याचं आव्हान आहे. टीम इंडियाचे माजी कॅप्टन सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी यावेळी इंग्लंडचा कॅप्टन जो रूटला (Joe Root) एक सल्ला दिला आहे.

इंग्लंडच्या टीमसमोर ही सीरिज वाचवण्याचं आव्हान आहे. टीम इंडियाचे माजी कॅप्टन सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी यावेळी इंग्लंडचा कॅप्टन जो रूटला (Joe Root) एक सल्ला दिला आहे.

मुंबई, 23 ऑगस्ट : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरी टेस्ट (India vs England 3rd Test) बुधवारपासून हेडिंग्लेमध्ये सुरु होणार आहे. या सीरिजमध्ये यजमान इंग्लंडची टीम 0-1 नं मागं आहे. लॉर्ड्स टेस्टमध्ये जो रूटच्या टीमचा 151 रननं मोठा पराभव झाला. तर नॉटिंघम टेस्टमध्ये पावसामुळे त्यांची लाज वाचली होती. आता हेंडिग्लेच्या मैदानावर टीम इंडियाचा रेकॉर्ड भक्कम आहे. तर इंग्लंडच्या टीमसमोर ही सीरिज वाचवण्याचं आव्हान आहे. टीम इंडियाचे माजी कॅप्टन सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी यावेळी इंग्लंडचा कॅप्टन जो रूटला (Joe Root) एक सल्ला दिला आहे.

'मी जो रूट असतो तर ऑल राऊंडर बेन स्टोक्सला (Ben Stokes) ब्रेकमधून परत येण्याची विनंती केली असती', असे गावसरकरांनी म्हंटले आहे. 'तो संपूर्ण खेळावर परिणाम करणारा खेळाडू आहे. इंग्लंडच्या दिशेनं मॅच झुकवण्याची त्याच्यात क्षमता आहे. जो व्यक्ती क्रिकेटसाठी बनला आहे, तोच खेळत नाहीय. ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे', असे गावसकरांनी 'द टेलिग्राफ' वृत्तपत्रामध्ये लिहिलेल्या कॉलममध्ये स्पष्ट केले आहे.

'बेन स्टोक्सचं न खेळणं हे फक्त इंग्लंडचं नाही तर संपूर्ण क्रिकेट विश्वाचं नुकसान आहे. संपूर्ण पिढीमध्ये या प्रकारचा एकच खेळाडू असतो,' असेही गावसकरांनी या कॉलममध्ये म्हंटले आहे. बेन स्टोक्सनं सध्या मानसिक ताणामुळे अनिश्चित काळासाठी क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे.

IND vs ENG : टीम इंडिया लीड्सला पोहोचली, 19 वर्षांपूर्वी इथेच रचला होता इतिहास

इंग्लंडच्या मॅनेजमेंटची भूमिका काय?

'भारताविरुद्ध सीरिजमध्ये पिछाडीवर पडल्यानंतरही आपण स्टोक्सवर पुनरागमनासाठी कोणताही दबाव टाकणार नाही.  स्टोक्सला सावरण्यासाठी जितका  वेळ हवा आहे, तितका दिला जाईल,' असं इंग्लंड क्रिकेट टीमचे हेड कोच ख्रिस सिल्वरवूड  (Chris Silverwood) यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

'माझ्या मते आम्हाला स्टोक्सच्या पुनरागमनाची प्रतीक्षा करावी लागेल. या विषयावर त्याच्यावर दबाव टाकणे योग्य नाही. तो स्वत: खेळण्यासाठी सज्ज आहे हे सांगेपर्यंत वाट पाहण्याची आमची तयारी आहे.'असे सिल्वरवूड यांनी सांगितले आहे. इंग्लंडचा कॅप्टन जो रूट यानेही याच प्रकारचे वक्तव्य केले आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket news, India vs england, Sunil gavaskar