मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

U19 WC, IND vs ENG: भारत विरुद्ध इंग्लंड फायनलमध्ये पावसाचा अडथळा! वाचा कसे आहे हवामान

U19 WC, IND vs ENG: भारत विरुद्ध इंग्लंड फायनलमध्ये पावसाचा अडथळा! वाचा कसे आहे हवामान

भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यात अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेची फायनल (U19 World Cup 2022 Final) आज (शनिवारी) होणार आहे. या फायनलकडे लक्ष लागलेल्या क्रिकेट फॅन्ससाठी महत्त्वाची बातमी आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 5 फेब्रुवारी: भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यात अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेची फायनल (U19 World Cup 2022 Final) आज (शनिवारी) होणार आहे. ही फायनल जिंकून पाचव्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याची टीम इंडियाला संधी आहे. तर इंग्लंडची टीम तब्बल 24 वर्षांनी फायनलमध्ये दाखल झाली आहे. टीम इंडियानं यापूर्वी 2018 साली तर इंग्लंडनं 1998 साली अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला आहे. आता  फायनलमध्ये त्यांच्यात रंगतदार लढतीची अपेक्षा आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील फायनल मॅच अँटीगामध्ये होत असून तिथे शनिवारी पावसाचा अंदाज आहे.  शुक्रवारी संध्याकाळी आणि रात्री होणाऱ्या पावसामुळे फायनल उशीरा सुरू होऊ शकते. त्याचबरोबर सकाळी ढगाळ वातावरण आहे. 'वेदर डॉट कॉम' नुसार दुपारी देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

5 आणि 6 फेब्रुवारी दोन दिवस पावसाचा अंदाज असल्यानं क्रिकेट फॅन्सची निराशा होण्याची शक्यता आहे. सर व्हिव्हियन रिचर्ड स्टेडियम हे बॅटर आणि बॉलर दोघांनाही मदत करणारे आहे. 239 ही या पिचवरील सरासरी धावसंख्या आहे. या स्टेडियमवर आजवर 20 सामने झाले आहेत. पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा बॅटींग करणाऱ्या टीमनं 10-10 वेळा सामना जिंकला आहे.

ऑस्ट्रेलियन टीमचा नवा कोच ठरला, पाकिस्तान दौऱ्यासाठी मिळाली जबाबदारी

भारतीय टीम

यश ढूल (कर्णधार), शेख राशिद (उपकर्णधार), आराध्य यादव, दिनेश बाना, राज बावा, अनिश्वर गौतम, राजवर्धन हंगर्गेकर, हरनूर सिंग, मानव पारख, विक्की ओस्तवाल, अंगकृष रघुवंशी, रवी कुमार, गर्व सांगवान, सिद्धार्थ यादव, निशांत सिंधू, कौशल तांबे, वासू वत्स

इंग्लंडची टीम

टॉम प्रीस्ट (कर्णधार), जॉर्ज बेल, जोशुआ बॉयडेन, एलेक्स होर्टन, रेहान अहमद, जेम्स सेल्स, जॉर्ज थॉमस, थॉमस एस्पिनवाल, नॅथन बर्नवेल, जेकब बेथेल, जेम्स कोलेस, विलियम लक्सटन, जेम्स रियू, फतेह सिंग, बेंजामिन क्लिफ

First published:

Tags: Cricket, Cricket news, India vs england, Sports, Weather forecast, World cup india