जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs ENG: जो रूट ठरतोय टीम इंडियाची सर्वात मोठी डोकेदुखी, लीड्समध्ये करणार नवा रेकॉर्ड

IND vs ENG: जो रूट ठरतोय टीम इंडियाची सर्वात मोठी डोकेदुखी, लीड्समध्ये करणार नवा रेकॉर्ड

IND vs ENG: जो रूट ठरतोय टीम इंडियाची सर्वात मोठी डोकेदुखी, लीड्समध्ये करणार नवा रेकॉर्ड

टीम इंडियाला 14 वर्षांनी इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकण्यामध्ये सर्वात मोठा अडथळा जो रूटचा (Joe Root) आहे. या सीरिजमध्ये रूट जबरदस्त फॉर्मात आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

हेंडिग्ले, 25 ऑगस्ट: टीम इंडियाला 14 वर्षांनी इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकण्यामध्ये सर्वात मोठा अडथळा जो रूटचा (Joe Root) आहे. या सीरिजमध्ये रूट जबरदस्त फॉर्मात आहे. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात भारताविरुद्ध 2100 पेक्षा जास्त रन करणाऱ्या मोजक्या बॅट्समनमध्ये रूटचा समावेश आहे. बुधवारी तो तिसऱ्या टेस्टसाठी लीड्सवर उतरेल त्यावेळी त्याला एक मोठा रेकॉर्ड करण्याची संधी आहे. जो रूटनं भारताविरुद्ध या वर्षात तीन शतक झळकावले आहेत. त्यानं पहिलं शतक चेन्नईत लगावलं. या शतकाचं त्यानं द्विशतकामध्ये रूपांतर केलं. नॉटिंघममध्ये ड्रॉ झालेल्या पहिल्या टेस्टमध्येही रुटनं शतक झळकावले होते. लॉर्ड्स टेस्टमध्ये इंग्लंडचा पराभव झाला. पण पहिल्या इनिंगमध्ये रूटला शतक करण्यापासून रोखण्यात आणि त्याला आऊट करण्यात भारतीय बॉलर्सना यश आले नव्हते. रुटनं भारताविरुद्ध आत्तापर्यंत 22 टेस्ट खेळल्या आहेत. यामध्ये त्यानं 60.41 च्या सरासरीनं 2175 रन काढले आहेत. यामध्ये 7 शतकांचा समावेश आहे. भारताविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्त रन रिकी पॉन्टिंगनं काढले आहेत. पॉन्टिंगनं 54.36 च्या सरासरीनं 8 शतकांच्या मदतीनं 2555 रन काढले आहेत. एलिस्टर कुकनं 30 मॅचमध्ये 47.66 च्या सरासरीनं 2431 रन केले असून तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावरील क्लाईव्ह लॉयडनं 58. 60 च्या सरासरीनं 2344 रन केले आहेत. पण तिघांचीही सरासरी रुटपेक्षा कमी आहे. WTC Point Table: पाकिस्तानचा वेस्ट इंडिजवर विजय पण टीम इंडियाला झाला फायदा पाकिस्तानच्या जावेद मियांदाद या एकमेव बॅट्समननं भारताच्या विरुद्ध जो रूटपेक्षा जास्त रन, जास्त सरासरीनं काढले आहेत. पण लीड्स टेस्टमध्ये मियांदादचा हा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे. मियांदादनं भारताविरुद्ध  67.51 च्या सरासरीनं 2228 रन केले आहेत. रुट त्याच्या 53 रन मागे आहे. त्याचा फॉर्म पाहता तो या टेस्टमध्ये मियांदादला मागे टाकण्याची शक्यता आहे. शतकांचा विचार केला तर मियांदादनं भारताविरुद्ध 5 शतक झळकावली असून त्याला रुटनं यापूर्वीच मागं टाकलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात