लंडन, 16 जुलै : इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टेस्टपूर्वी टीम इंडियातील दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर तीन जणांना खबरदारीचा उपाय म्हणून आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. पाकिस्तान विरुद्धच्या वन-डे मालिकेपूर्वी इंग्लंड टीममधील सात जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला
(ECB) संपूर्ण टीम बदलावी लागली होती. इंग्लंडमध्ये कोरोना पेशंट्सचं प्रमाण रोज वाढत आहे. बुधवारी एका दिवसात इंग्लंडमध्ये 42 हजार नवे पेशंट्स आढळले आहेत. या सर्व घटनांनंतरही इसीबीनं एक धक्कादायक निर्णय घेतला आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट मालिकेसाठी
(India vs England) बायो-बबल कडक न करण्याचा निर्णय इसीबीनं घेतला आहे. या काळात खेळाडू हॉटेलच्या बाहेर वर्कआऊट करु शकतील. त्याचबरोबर त्यांना कुटुंबीयांना भेटण्याची देखील परवानगी देण्यात आली आहे.
इसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हॅरीसन यांनी या विषयावर बोर्डाची भूमिका स्पष्ट केली आहे. ' कोरोनाचा सामना करताना गेली सहा महिने किंवा वर्षभरापेक्षा परिस्थिती वेगळी आहे. आपण आता परिस्थितीबरोबर जगणं शिकलं आहे. लोकं बायो-बबलच्या ऐवजी सुरक्षित वातावरण तयार करत आहेत. खेळाडूंना बायो-बबलचा उबग आला आहे. यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. कोरोनाचा सामना कसा करायचा हे आपल्याला शिकायला हवे.'
'
ती वेळ पुन्हा येऊ नये'
'पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेत आम्हाला संपूर्ण टीम बदलण्याची वेळ आली. एक किंवा दोन प्रकरणांमुळे संपूर्ण टीम बदलण्याची वेळ येणार नाही, याचा आम्ही प्रयत्न करू. इंग्लंडमधील सर्व आंतरराष्ट्रीय आणि काऊंटी टीमना या नव्या प्रोटोकॉलची माहिती देण्यात आली आहे.' असे त्यांनी स्पष्ट केले.
सौरव गांगुलीनं केला कोरोना पॉझिटिव्ह ऋषभ पंतचा बचाव, म्हणाले...
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टेस्ट मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पाच टेस्टच्या या मालिकेतील शेवटची टेस्ट 10 ते 14 सप्टेंबर दरम्यान खेळवली जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.