• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • सौरव गांगुलीनं केला कोरोना पॉझिटिव्ह ऋषभ पंतचा बचाव, म्हणाले...

सौरव गांगुलीनं केला कोरोना पॉझिटिव्ह ऋषभ पंतचा बचाव, म्हणाले...

कोरोना काळात धोकादायक ठिकाणी विनामास्क फिरल्यानंच टीम इंडियाला कोरोनाचा फटका बसल्याचं मानलं जात आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी ऋषभ पंतचा (Rishabh Pant) बचाव केला आहे.

 • Share this:
  मुंबई, 16 जुलै : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील पहिल्या टेस्टपूर्वी टीम इंडियाची काळजी वाढली आहे. प्रमुख विकेट किपर - बॅट्समन ऋषभ पंतला (Rishabh Pant) झालेली कोरोनाची लागण हा काळजीचा मुख्य विषय आहे. पंतसह टीम इंडियातील सपोर्ट स्टाफ थ्रोडाउन स्पेशालिस्ट दयानंद जारानी (Dayanand Garani) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर यष्टीरक्षक ऋद्धीमान साहा हा सुदधा आयसोलेशनमध्ये गेला आहे. भारतीय खेळाडूंनी 20 दिवसांच्या सुट्टीमध्ये इंग्लंडमधील सार्वजनिक ठिकाणी विनामास्क प्रवास केला. विम्बल्डन, युरो कप या गर्दीच्या ठिकाणी हजेरी लावली. धोकायक ठिकाणी विना मास्क फिरल्यानंच टीम इंडियाला कोरनाचा फटका बसला असल्याचं मानलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांची  पहिली प्रतिक्रिया आली आहे. 'क्रिकेट नेक्स्ट' या आमच्या सहयोगी वेबसाईटला गांगुली यांनी मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी ऋषभ पंतचा बचाव केला आहे. ऋषभ पंत कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. भारतीय टीम सुट्टीवर असताना हा प्रकार घडला. काही जण विना मास्क फिरताना दिसले. त्यांनी आणखी सावध राहणे आवश्यक होते का? असा प्रश्न गांगुली यांना विचारण्यात आला होता. त्यावर गांगुली यांनी उत्तर देताना पंतचा बचाव केला. 'आपण इंग्लंडमधील युरो कप आणि विम्बल्डन स्पर्धेच्या दरम्यान पाहिले आहे. नियम बदलले आहेत. (प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी आहे.) तो सुट्टीवर होता आणि प्रत्येक वेळी मास्क घालणे शारीरिक दृष्ट्या शक्य नाही.' असे गांगुली यांनी स्पष्ट केले. ऋषभ पंत लवकरच बरा होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. IND vs SL : श्रीलंकेला मोठा धक्का, प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे आऊट दोन्ही टीमना संधी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच टेस्टची मोठी मालिका होणार आहे. टीम इंडिया चांगलं क्रिकेट खेळेल. केवळ एकच टेस्ट या मालिकेचा निकाल निश्चित करणार नाही. दोन्ही टीमना समान संधी असेल, असे गांगुलींनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. शुभमन गिलच्या दुखापतीनंतर निर्माण झालेल्या प्रश्नावर बोलण्यास गांगुली यांनी नकार दिला.
  Published by:News18 Desk
  First published: