मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : टीम इंडिया लीड्सला पोहोचली, 19 वर्षांपूर्वी इथेच रचला होता इतिहास

IND vs ENG : टीम इंडिया लीड्सला पोहोचली, 19 वर्षांपूर्वी इथेच रचला होता इतिहास

भारत-इंग्लंड यांच्यातली लीड्स टेस्ट 25 ऑगस्टपासून

भारत-इंग्लंड यांच्यातली लीड्स टेस्ट 25 ऑगस्टपासून

भारत आणि इंग्लंड यांच्यातली तिसरी टेस्ट (India vs England Third Test) 25 ऑगस्ट बुधवारपासून हेडिंग्लेमध्ये सुरू होणार आहे. यासाठी विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात टीम इंडिया लीड्सला पोहोचली आहे.

  • Published by:  Shreyas

हेडिंग्ले, 22 ऑगस्ट : भारत आणि इंग्लंड यांच्यातली तिसरी टेस्ट (India vs England Third Test) 25 ऑगस्ट बुधवारपासून हेडिंग्लेमध्ये सुरू होणार आहे. यासाठी विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात टीम इंडिया लीड्सला पोहोचली आहे. 5 टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर आहे. लीड्सच्या (Leeds Test) मैदानात टीम इंडियाला 19 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी आहे. भारतीय टीमचा मागच्या 54 वर्षांत या मैदानात पराभव झालेला नाही. 2002 साली सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंडचा या मैदानात पराभव केला होता. त्या मॅचमध्ये राहुल द्रविड (Rahul Dravid), सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि सौरव गांगुली यांनी धमाकेदार शतक केलं होतं.

हेडिंग्लेमध्ये टीम इंडियाने एकूण 6 टेस्ट खेळल्या आहेत. यातल्या 2 टेस्टमध्ये टीम इंडियाचा विजय झाला आहे, तर 3 मॅचमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला आणि एक मॅच ड्रॉ झाली. टीम इंडियाने या मैदानात मागच्या दोन्ही टेस्ट जिंकल्या. तसंच 1967 नंतर एकही टेस्ट गमावली नाही. 1986 साली झालेल्या सामन्यात भारताने इंग्लंडचा 279 रनने पराभव केला होता, तर 2002 साली टीम इंडियाचा इनिंग आणि 46 रनने विजय झाला.

22 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट 2002 साली झालेल्या मॅचवेळी भारताने पहिली बॅटिंग करत 8 विकेट गमावून 628 रन केले. टीम इंडियाची या सामन्यात चांगली सुरुवात झाली नाही. ओपनर वीरेंद्र सेहवागला मॅथ्यू हॉगार्डने 8 रनवर आऊट केलं. यानंतर राहुल द्रविडने 148 रन, सचिन तेंडुलकरने 193 आणि सौरव गांगुलीने 128 रनची खेळी केली. याशिवाय संजय बांगरनेही (Sanjay Bangar) 68 रन केले.

यानंतर इंग्लंडचा पहिल्या इनिंगमध्ये 273 रनवर ऑल आऊट झाला. एलेक स्टुअर्टने सर्वाधिक 78 रन केले. अनिल कुंबळे (Anil Kumble) आणि हरभजन सिंग यांना प्रत्येकी 3-3 विकेट मिळाल्या. पहिल्या इनिंगमध्ये 355 रनने मागे पडल्यानंतर भारताने इंग्लंडला फॉलोऑन दिला. यानंतर इंग्लंडची दुसरी इनिंग 309 रनवर संपली. कर्णधार नासीर हुसेनचं शतकही इंग्लंडला वाचवू शकलं नाही. दुसऱ्या इनिंगमध्ये कुंबळेने 4 विकेट घेतल्या. द्रविडला त्याच्या खेळीबद्दल मॅन ऑफ द मॅच देण्यात आलं.

First published:

Tags: India vs england