मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

ऋषभ पंतला Euro कप पडला महागात! वाचा, टीम इंडियातील कोरोना शिरकावाची Inside Story

ऋषभ पंतला Euro कप पडला महागात! वाचा, टीम इंडियातील कोरोना शिरकावाची Inside Story

इंग्लंडमधील वाढत्या करोना व्हायरस (Coronavirus) संक्रमणाचा फटका टीम इंडियालाही बसला आहे. टीम इंडियाचा विकेट किपर - बॅट्समन ऋषभ पंतला (Rishabh Pant) कोरोनाची लागण झाली आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 15 जुलै : इंग्लंडमधील वाढत्या करोना व्हायरस (Coronavirus) संक्रमणाचा फटका टीम इंडियालाही बसला आहे. इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या एका खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे, असं वृत्त काही वेळापूर्वी आले होते. आता त्या पॉझिटीव्ह खेळाडूचे नाव रिपोर्टमधून समोर आले आहे. माध्यमातील माहितीनुसार टीम इंडियाचा विकेट किपर - बॅट्समन ऋषभ पंतला (Rishabh Pant) कोरोनाची लागण झाली आहे. ऋषभ पंत अन्य सदस्यांबरोबर डरहमला दाखल झालेला नाही. त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. डरहममध्ये टीम इंडिया टेस्ट सीरिजची तयारी करणार आहे. पंत हा टीम इंडियातील महत्त्वाचा सदस्य आहे. तो सुट्टीच्या दौऱ्यानं युरो कप स्पर्धेतील  (Euro Cup 2021) मॅच पाहण्यासाठी देखील गेला होता. इंग्लंड विरुद्ध जर्मनी (England vs Germany) हा सामना पंतनं प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडियममध्ये पाहिला होता. पंतचं हे धाडस त्याच्या अंगाशी आलं असं मानलं जात आहे.  भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिली टेस्ट 4 ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. या टेस्टपूर्वी पंत कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानं टीम मॅनेजमेंटची चिंता वाढली आहे. IND vs ENG: टीम इंडियाला कोरोना लाटेतील निष्काळजीपणा भोवला, खेळाडूंचं आरोग्य धोक्यात इंग्लंडच्या खेळाडूंनाही झाली होती लागण पाकिस्तानविरुद्धची वनडे सीरिज सुरू व्हायच्या दोन दिवस आधीच इंग्लंडच्या (England vs Pakistan) टीममधल्या 7 जणांना कोरोनाची (Corona Virus) लागण झाली आहे. यामध्ये 3 खेळाडू आणि 4 सपोर्ट स्टाफचा समावेश होता. या सर्वांना कोरोना झाल्यानं इंग्लंडच्या मुख्य खेळाडूंना आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले होते. त्यानंतर वन-डे सीरिजसाठी संपूर्ण नव्या टीमची निवड इंग्लंड क्रिकेट बोर्डानं केली होती.
First published:

Tags: Coronavirus, India vs england, Rishabh pant

पुढील बातम्या