नॉटिंगहम, 4 ऑगस्ट : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात नॉटिंगहममध्ये (India vs England 1st Test) पहिली टेस्ट सुरु आहे. या टेस्टमध्ये टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली. त्यांच्या पहिल्या तीन विकेट्स झटपट गेल्या. त्यानंतर इंग्लंडला चौथा धक्काही लगेच बसला असता, पण मोहम्मद शमीनं (Mohammad Shami) केलेल्या चुकीचा त्यांना फायदा झाला.
इंग्लंडच्या इनिंगमधील 39 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. रविंद्र जडेजाच्या त्या ओव्हरमधील पाचवा बॉल जॉनी बेअरस्टोनं (Jonny Bairstow) टोलावला आणि तो एक रनसाठी पळाला. शमीनं तो बॉल तात्काळ अडवला. ते पाहाताच इंग्लंडचा कॅप्टन जो रूटनं बेअरस्टोला परत पाठवले. बेअरस्टो तो पर्यंत अर्ध्या क्रिजच्या पुढे आला होता.
शमीनं त्यावेळी तात्काळ विकेट किपर ऋषभ पंतकडे (Rishabh Pant) थ्रो केला असता तर बेअरस्टो रन आऊट झाला असता. पंतनं ओरडून तशी मागणी देखील केली होती. मात्र शमीनं त्याकडं बॉलिंग करत असलेल्या जडेजाकडं थ्रो केला. जडेजानं तो बॉल पुन्हा पंतकडे थ्रो केला. तोपर्यंत बेअरस्टोला क्रिजमध्ये परत येण्याची संधी मिळाली. शमीच्या चुकीमुळे बेअरस्टोला रन आऊट करण्याची सोपी संधी टीम इंडियानं गमावली. त्यामुळे ऋषभ पंतचा चेहरा पडला. बेअरस्टो त्यावेळी सात रनवर खेळत होता.
पंतमुळे मिळाली विकेट
त्यापूर्वी ऋषभ पंतनं DRS घेण्याचा जोरदार आग्रह केल्यामुळेच टीम इंडियाला झॅक क्राऊलीची विकेट मिळाली. मोहम्मद सिराजच्या बॉलिंगवर क्राऊलीच्या बॅटला लागून बॉल पंतकडे गेला. त्यावेळी पंतनं कॅच आऊटचं अपिल केलं. मैदानातील अंपायरनं ते फेटाळलं. विराट कोहली देखील Review घेण्याच्या विचारात नव्हता. मात्र पंतनं कोहलीकडं जोरदार आग्रह केला.
IPL 2021 : KKR च्या 'बादशहा'चं टेन्शन खल्लास, उर्वरित स्पर्धेत 'सेनापती' खेळणार
पंतच्या या आग्रहामुळेच कोहलीनं अखेर थर्ड अंपायरकडे दाद मागितली. त्यावेळी रिप्लेमध्ये क्राऊलीच्या बॅटसा बॉल लागल्याचं रिप्लेमध्ये स्पष्ट झालं. त्यामुळे भारताला दुसरी विकेट मिळाली. पंतचा पहिला निर्णय चुकला असला तरी त्यानंच दोन बॉलनंतर केलेल्या आग्रहामुळे भारताला हे यश मिळाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs england