जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / स्पायडरमॅन, स्पायडरमॅन... ऋषभ पंतचा नवा VIDEO तुम्ही पाहिला का?

स्पायडरमॅन, स्पायडरमॅन... ऋषभ पंतचा नवा VIDEO तुम्ही पाहिला का?

स्पायडरमॅन, स्पायडरमॅन... ऋषभ पंतचा नवा VIDEO तुम्ही पाहिला का?

ऋषभ पंत सध्या अहमदाबादमध्ये पुढच्या टेस्टसाठी ट्रेनिंग घेत आहे. पंत व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ वॉशिंग्टन सुंदरनं ट्विटरवर (Twitter) शेअर केला आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

अहमदाबाद, 20 फेब्रुवारी : भारत विरुद्ध (IND vs ENG) इंग्लंड यांच्यातील तिसरी टेस्ट अहमदाबादमध्ये (Ahmedabad) 24 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या मालिकेत सध्या दोन्ही टीम 1-1 नं बरोबरीत आहेत. त्यामुळे आगामी टेस्ट जिंकून आघाडी मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. चेन्नईहून अहमदाबादला दाखल होताच दोन्ही टीमचे खेळाडू आता सरावाला लागले आहेत. भारताचा विकेटकिपर-बॅट्समन ऋषभ पंत (Rishabh Pant) हा त्याच्या धडाकेबाज खेळाबरोबरच त्याच्या उत्साही स्वभावाबद्दलही ओळखला जातो. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या टेस्टच्या दरम्यान वॉशिंग्टन सुंदर (Washington Sunder) बॉलिंग करत असताना पंतनं चक्क कविता गायली होती. ‘माझं नाव आहे वॉशिंग्टन आणि मला जायचं आहे डीसी’  पंतची ही मजेशीर कविता स्टंप माईकमध्ये कैद झाली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ‘स्पाडयर मॅन- स्पाडयर मॅन’ या गाण्यानंतर पंतचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाली होती. ऋषभ पंत सध्या अहमदाबादमध्ये पुढच्या टेस्टसाठी ट्रेनिंग घेत आहे. पंत व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ वॉशिंग्टन सुंदरनं ट्विटरवर (Twitter) शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पंत स्पायडरमॅनच्या स्टेप प्रमाणे व्यायाम करत आहे. सुंदरनं या व्हिडीओला ‘स्पायडरमॅन, स्पायडर मॅन’ असं कॅप्शन दिलं असून त्या गाण्याचं संगीत देखील व्हिडीओला लावलं आहे.

जाहिरात

(हे वाचा :  IND vs ENG : ऋषभ पंत बनला ‘कवी’, ‘स्पायडर मॅन’ नंतर आणखी एक VIDEO VIRAL ) पंत आणि स्पायडरमॅनचा संबंध काय? भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात ब्रिस्बेनमध्ये झालेल्या चौथ्या टेस्टच्या दरम्यान ऋषभ पंतनं एक गाणं गायलं होतं. स्पायडरमॅन स्पायडरमॅन, तुने चुराया मेरा दिल का चैन’ हे गाणं गात असल्याचा पंतचा आवाज स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झाला होता. त्यानंतर हा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. उत्तर प्रदेश पोलिसांनी (UP Police) देखील याचा संदर्भ वापरत एक ट्विट केलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात