मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG: मोठी बातमी! टीम इंडियात कोरोनाची भीती, सिनिअर खेळाडूचा खेळण्यास नकार

IND vs ENG: मोठी बातमी! टीम इंडियात कोरोनाची भीती, सिनिअर खेळाडूचा खेळण्यास नकार

भारतीय क्रिकेट टीमच्या (Indian Cricket Team) सर्व खेळाडूंचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. मात्र याचवेळी टीम इंडियामध्ये कोरोनाची भीती वाढली आहे. एक वरिष्ठ खेळाडू मँचेस्टर टेस्ट खेळण्यास तयार नसल्याचं वृत्त आहे.

मँचेस्टर, 10 सप्टेंबर: भारतीय क्रिकेट टीमच्या (Indian Cricket Team) सर्व खेळाडूंचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात आजपासून म्हणजेच 10 सप्टेंबरपासून सुरु होणारी टेस्ट होण्याची आशा वाढली आहे. मात्र याचवेळी टीम इंडियामध्ये कोरोनाची भीती वाढली आहे. टीमचे ज्यूनिअर फिजियो योगेश परमार हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यानंतर एक वरिष्ठ खेळाडू ही टेस्ट खेळण्यास तयार नसल्याचं वृत्त आहे.

'पीटीआय'च्या वृत्तानुसार या सिनिअर खेळाडूनं मॅचच्या दरम्यान कोणत्या खेळाडूला कोरोनाची लागण झाली तर परिस्थिती आणखी खराब होईल अशी चिंता व्यक्त केली आहे. ईसीबी अध्यक्ष टॉम हॅरीसन हे त्याच्याशी चर्चा करुन त्याची काळजी दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. टीम इंडियातील बाकी सर्व सदस्यांचं ही टेस्ट व्हावी असं मत आहे. या सिनिअर खेळाडूनं त्यांचं मत मानलं नाही तर त्याला आराम करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.

टीम इंडियाचे सर्व खेळाडूंचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानं मॅच होण्याची पूर्ण आशा आहे, असं मत यापूर्वी बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केलं आहे. योगेश परमार यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर टीम इंडियाचे सगळे खेळाडू हॉटेलमध्येच क्वारंटाईन झाले, तसंच त्यांनी सरावही रद्द केला.

योगेश परमार कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं टीम इंडियासाठी आता एकही फिजिओ उपलब्ध नाही. ओव्हल टेस्टच्या दरम्यान  कोच रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुख्य फिजियो नितीन पटेल सध्या क्वारंटाईन आहेत. त्यामुळे आता बीसीसीआयमं ईसीबीकडं फिजियोची सेवा देण्याची मागणी केली आहे.

अफगाणिस्तान क्रिकेटमधील पेच चिघळला, T20 वर्ल्ड कपसाठी टीम जाहीर होताच राशिद खानचा मोठा निर्णय

5 टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. पहिली टेस्ट मॅच ड्रॉ झाल्यानंतर लॉर्ड्सवर झालेली दुसरी टेस्ट भारताने जिंकली, तर तिसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडने पुनरागमन केलं. यानंतर ओव्हलमध्ये झालेली चौथी टेस्ट भारताने जिंकली.

First published:
top videos

    Tags: Cricket news, India vs england