मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : मँचेस्टर टेस्टवर IPL भारी! वाचा टीम इंडियाच्या माघारीची Inside Story

IND vs ENG : मँचेस्टर टेस्टवर IPL भारी! वाचा टीम इंडियाच्या माघारीची Inside Story

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात मँचेस्टरमध्ये होणारी पाचवी टेस्ट IND vs ENG Manchester Test) रद्द झाली आहे. टीम इंडियानं या टेस्टमधून माघार घेतल्यानं ही टेस्ट सध्या रद्द झाली आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात मँचेस्टरमध्ये होणारी पाचवी टेस्ट IND vs ENG Manchester Test) रद्द झाली आहे. टीम इंडियानं या टेस्टमधून माघार घेतल्यानं ही टेस्ट सध्या रद्द झाली आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात मँचेस्टरमध्ये होणारी पाचवी टेस्ट IND vs ENG Manchester Test) रद्द झाली आहे. टीम इंडियानं या टेस्टमधून माघार घेतल्यानं ही टेस्ट सध्या रद्द झाली आहे.

मँचेस्टर, 10 सप्टेंबर : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात मँचेस्टरमध्ये होणारी पाचवी टेस्ट IND vs ENG Manchester Test) रद्द झाली आहे. टीम इंडियानं या टेस्टमधून माघार घेतल्यानं ही टेस्ट सध्या रद्द झाली आहे. आता ही टेस्ट नंतर खेळवली जाणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या सुत्रांनी दिली आहे. एक दिवसांपूर्वीच टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंचा करोनो रिपोर्ट निगेटीव्ह आला होता. तरीही टीम इंडियानं ही टेस्ट खेळण्यास का नकार दिला? याची माहिती आता समोर आली आहे.

'इंडियन एक्स्प्रेस' नं दिलेल्या वृत्तानुसार भारतीय खेळाडूंची गुरुवारी संध्याकाळी बैठक झाली. या बैठकीत बहुतेक खेळाडूंनी पाचवी टेस्ट खेळण्यास नकार दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मँचेस्टर टेस्ट संपल्यानंतर 4 दिवसांनीच यूएईमध्ये आयपीएल स्पर्धेचा दुसरा टप्पा (IPL 2021, Phase 2) सुरु होत आहे. त्यापूर्वी खेळाडूंना कोरोनाची लागण होण्याची भीती सतावत होती.

टीम इंडियाचे काही खेळाडू फिजियो योगेश परमार यांच्या थेट संपर्कात आले होते. त्यांना कोरोनाची भीती जास्त वाटत होती. कोरोना व्हायरसचे लक्षणं समजण्यास काही दिवसांचा वेळ लागतो, त्यामुळे पुढे काय होणार? ही चिंता या खेळाडूंना होती. तसंच रोहित शर्मा  (Rohit Sharma), चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara), मोहम्मद शमी (Mohammed Shami)  हे खेळाडू गेल्या काही दिवसांमध्ये दुखापतग्रस्त झाले होते. त्यामुळे देखील टीममध्ये काळजीचं वातावरण होतं.

T20 World Cup 2021: टीम इंडियाच्या निवडीनंतर रवी शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया, धोनीबद्दल म्हणाले...

BCCI चं मत काय?

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) देखील मँचेस्टर टेस्ट खेळण्यास तयार नव्हतं, अशी माहिती आहे. मँचेस्टर टेस्टमुळे आयपीएलच्या वेळापत्रकावर काही परिणाम होऊ नये, असं बीसीसीआयचं मत होतं. बीसीसीआय या मुद्यावर इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या सतत संपर्कात होते. त्यानंतर दोन्ही बोर्डांनी परस्पर संमतीनं शुक्रवारी म्हणजेच मँचेस्टर टेस्टच्या पहिल्या दिवशी ही टेस्ट स्थगित झाल्याचं जाहीर केलं आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket news, India vs england