मुंबई, 18 ऑगस्ट : भारताच्या विरुद्ध लॉर्ड्स टेस्टमध्ये (India vs England 2nd Test) पराभव झाल्यानंतर इंग्लंड टीममध्ये मोठे फेरबदल होण्याची चिन्हं आहेत. हेडिंग्लेमध्ये होणाऱ्या पुढच्या टेस्टमध्ये इंग्लंडची कमकुवत बॅटींग मजबूत करण्यासाठी दोन बॅट्समनचा टीममध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर लॉर्ड्स टेस्टमध्ये जखमी झालेल्या मार्क वूडचे खेळणे देखील अनिश्चित आहे. (फोटो: mawood33)