Home /News /sport /

IND vs ENG: लीड्समधील पराभवानंतर टीम इंडियाला मोठा धक्का, दिग्गज खेळाडूला दुखापत

IND vs ENG: लीड्समधील पराभवानंतर टीम इंडियाला मोठा धक्का, दिग्गज खेळाडूला दुखापत

लीड्स टेस्टमध्ये (India vs England, 3rd Test) टीम इंडियाचा 1 इनिंग आणि 76 रननं पराभव झाला. या मोठ्या पराभवातून सावरण्यापूर्वी टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे.

    हेडिंग्ले, 29 ऑगस्ट:  लीड्स टेस्टमध्ये (India vs England, 3rd Test) टीम इंडियाचा 1 इनिंग आणि 76 रननं पराभव झाला. या पराभवामुळे पाच टेस्टच्या मालिकेत इंग्लंडनं 1-1 नं बरोबरी साधली आहे. यापूर्वी लॉर्ड्सवर झालेली टेस्ट टीम इंडियानं जिंकली होती. लीड्स टेस्टच्या चौथ्या दिवशी भारतीय बॅट्समनकडून मोठ्या प्रतिकाराची अपेक्षा होती. पण, त्यांनी निराशा केली. टीम इंडियानं फक्त 63 रनमध्ये 8 विकेट्स गमावल्या. या मोठ्या पराभवातून सावरण्यापूर्वी टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे. टीम इंडियाचा ऑल राऊंडर रविंद्र जडेजाला (Ravindra Jadeja)  हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. जडेजानं त्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत त्यानं पेशंट्सना देण्यात येणारे कपडे घातले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार त्याला स्कॅन करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. लीड्स टेस्टमध्ये फिल्डिंग करत असताना जडेजाच्या पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर तो काही काळ मैदानाच्या बाहेर होता. जडेजा त्यानंतरही दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटींगला आला. एका बाजूनं सातत्यानं विकेट्स पडत असल्यानं त्यानं वेगवान बॅटींग करत 25 बॉलमध्ये 30 रन काढले. यामध्ये 5 फोर आणि 1 सिक्सचा समावेश आहे. त्यापूर्वी त्यानं इंग्लंडच्या पहिल्या इनिंगमध्ये 2 विकेट्स घेतल्या होत्या. हसीब हमीद आणि मोईल अलीला त्यानं आऊट केलं होतं. Tokyo Paralympics: पॅरालिम्पिक भारताची 'चांदी', भाविना पटेलनं रचला इतिहास जडेजा दुखापतग्रस्त होणे हा टीम इंडियाला मोठा धक्का आहे. त्याची दुखापत गंभीर असेल तर 2 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या चौथ्या टेस्टमध्ये तो खेळणार नाही. ओव्हलवर ही टेस्ट होणार आहे. ओव्हलचं पिच स्पिन बॉलर्सना मदत करणारं आहे. त्यामुळे या टेस्टमध्ये आर. अश्विनचा (R. Ashwin) प्लेईंग 11 मध्ये समावेश होण्याची पूर्ण शक्यता आहे. जडेजा त्यापूर्वी फिट झाला नाही, तर लोअर मिडल ऑर्डरमध्ये त्याची कमतरता जाणवणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, India vs england, Ravindra jadeja

    पुढील बातम्या