मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : लॉर्ड्सच्या बाल्कनीत विराट कोहलीचा नागीण डान्स! कॅप्टनला पाहून सर्वच खूश

IND vs ENG : लॉर्ड्सच्या बाल्कनीत विराट कोहलीचा नागीण डान्स! कॅप्टनला पाहून सर्वच खूश

भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेली लॉर्ड्स टेस्ट सध्या रंगतदार अवस्थेत आहे. या टेस्टच्या दरम्यान विराट कोहलीचा (Virat Kohli) एक मजेदार फोटो सध्या व्हायरल झाला आहे.

लॉर्ड्स, 14 ऑगस्ट : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेली लॉर्ड्स टेस्ट सध्या रंगतदार अवस्थेत आहे. टीम इंडियानं पहिल्या इनिंगमध्ये 364 रन केले. त्यानंतर सुरुवातीच्या दोन धक्क्यानंतर इंग्लंडची इनिंग सावरली आहे. इंग्लंडकडून कॅप्टन जो रूट (Joe Root) सध्या फॉर्मात आहे. त्याने या सीरिजमध्ये सलग तिसऱ्या इनिंगमध्ये 50 पेक्षा जास्त रन केले आहेत.

लॉर्ड्स टेस्टच्या दरम्यान टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीच्या (Virat Kohli) एका मजेदार कृतीचा फोटो सध्या व्हायरल झाला आहे. या फोटोत विराटनं डोक्यावर हात घेऊन एका खास पोज दिली आहे. विराटचा हा फोटो पाहून तो बाल्कनीमध्ये उपस्थित असलेले मोहम्मद सिराज, केएल राहुल, मयांक अग्रवाल हे सर्व भलतेच खूश दिसत आहेत. त्यांना हसू आवरत नाही. विराट नागीण डान्स करत आहे का? असा प्रश्न एका फॅन्सनं विचारला आहे.

IND vs ENG : इंग्लंडमध्ये फ्लॉप ठरलेल्या पुजारा -रहाणेचा राहुलनं केला बचाव

लॉर्ड्स टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये विराट कोहली मोठा स्कोअर करेल असं वाटत असतानाच 42 रन काढून आऊट झाला. त्यामुळे विराटच्या शतकाची प्रतीक्षा आणखी लांबली. रॉबिन्सनचा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल खेळण्याचा विराटचा प्रयत्न फसला. त्याच्या बॅटला लागलेला बॉल इंग्लंडचा कॅप्टन जो रूटच्या (Joe Root) हाती विसावला.  आम्ही त्याच्यासाठी खास योजना आखली होती. त्याला चौथ्या आणि पाचव्या स्टंपवर बॉलिंग करण्याची आमची योजना होती. सुदैवानं आम्ही त्यात यशस्वी ठरलो,' असे रॉबिन्सननं पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर सांगितलं होतं.

First published:

Tags: India vs england, Virat kohli