नॉटिंघम, 4 ऑगस्ट : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील पहिल्या टेस्टला नॉटिंगहममध्ये सुरुवात झाली आहे. इंग्लंडचा कॅप्टन जो रूटनं (Joe Root) टॉस जिंकून बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. या टेस्टच्या पहिल्याच दिवशी मैदानात जोरदार ड्रामा झाला.
आधी नॉट आऊट नंतर OUT
इंग्लडच्या ओव्हरमधील 21 व्या ओव्हरमध्ये हा ड्रामा झाला. टीम इंडियाकडून मोहम्मद सिराजनं (Mohammed Siraj) ती ओव्हर टाकली. त्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर झॅक क्राऊलीची कॅच घेतल्याचं अपिल ऋषभ पंतनं (Rishabh Pant) केलं. त्यानंतर विराट कोहलीनं DRS घेतला. या DRS मध्ये बॉल क्राऊलीच्या बॅटवर लागलं नसल्याचं स्पष्ट झालं. मात्र त्याचवेळी अंपायरनं LBW साठी देखील Review घेतला होता. त्यावर अंपायर्स कॉल करण्याचा निर्णय देत क्राऊली नॉट आऊट असल्याचा निर्णय थर्ड अंपायरनं दिला.
दोन बॉलनंतर बदललं चित्रं
क्राऊलीला या निर्णयाचा फार फायदा घेता आला नाही. सिराजच्या त्याच ओव्हरमधील शेवटच्या ओव्हरमध्ये सिराजचा बॉल क्राऊलीच्या बॅटला लागून पंतकडे गेला. त्यावेळी पंतनं अपिल केलं. मैदानातील अंपायरनं ते फेटाळलं. विराट कोहली देखील Review घेण्याच्या विचारात नव्हता. मात्र पंतनं कोहलीकडं जोरदार आग्रह केला.
पंतच्या या आग्रहामुळेच कोहलीनं अखेर थर्ड अंपायरकडे दाद मागितली. त्यावेळी रिप्लेमध्ये क्राऊलीच्या बॅटसा बॉल लागल्याचं रिप्लेमध्ये स्पष्ट झालं. त्यामुळे भारताला दुसरी विकेट मिळाली. पंतचा पहिला निर्णय चुकला असला तरी त्यानंच दोन बॉलनंतर केलेल्या आग्रहामुळे भारताला हे यश मिळाले.
Kohli reviews successfully 🙌
The replays show an inside edge off the bat as Zak Crawley walks back for 27 after being dismissed by Mohammed Siraj. #ENGvIND | #WTC23 | https://t.co/HOyTN1o5ml pic.twitter.com/W5Q0sGnhHp — ICC (@ICC) August 4, 2021
Tokyo Olympics : भारतीय महिलांच्या विजयी घौडदौडीला ब्रेक, सेमी फायनलमध्ये अर्जेंटीनाकडून पराभव
नॉटिंघम टेस्टमध्ये टीम इंडिया चार फास्ट बॉलर्ससह खेळत आहे. या टेस्टमध्ये बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर हे चार फास्ट बॉलर्स खेळत आहेत. तर रविंद्र जडेजा हा एकमेव स्पिन बॉलर अंतिम 11 मध्ये आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs england, Rishabh pant