लॉर्ड्स, 14 ऑगस्ट : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टेस्टमध्ये (India vs England 2nd Test) टीम इंडियानं पहिल्या इनिंगमध्ये 364 रन केले. पहिल्या दिवसाच्या अखेरीस 3 आऊट 276 रन असूनही दुसऱ्या दिवशी भारतीय बॅट्समना मोठा स्कोर करता आला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात दोन विकेट्स झटपट पडल्या. त्यानंतर टीम इंडियाचा विकेटकिपर-बॅट्समन ऋषभ पंतनं (Rishabh Pant) 37 रनची खेळी केली. पंतनं या खेळीच्या दरम्यान टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीचा (MS Dhoni) खास रेकॉर्ड मोडला आहे.
ऋषभ पंतनं 58 बॉलमध्ये 5 फोरच्या मदतीनं 37 रन काढले. तो या खेळीच्या दरम्यान भारताच्या बाहेर सर्वात वेगानं 1000 टेस्ट रन पूर्ण करणारा विकेटकिपर-बॅट्समन बनला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड महेंद्रसिंह धोनीच्या नावावर होता. धोनीनं 32 इनिंगमध्ये 1000 चा टप्पा ओलांडला होता. पंतनं हे रन 29 इनिंगमध्येच पूर्ण केले आहेत.
Fastest to 1000 Test runs in Away matches by Indian WK
29 Inngs - Rishabh Pant* 32 Inngs - MS Dhoni 33 Inngs - F Engineer#ENGvIND — saurabh sharma (@cntact2saurabh) August 13, 2021
टीम इंडियाला दुसऱ्या दिवशी फार कमाल करता आली नाही. पहिल्या दोन ओव्हरमध्येच 2 धक्के बसले. केएल राहुलला (KL Rahul) रॉबिनसनने 129 रनवर आणि अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) जेम्स अँडरसनने 1 रनवर आऊट केलं. यानंतर ऋषभ पंतने (Rishabh Pant) इंग्लंडच्या बॉलिंगवर आक्रमण केलं, पण तोही 37 रन करून आऊट झाला. मार्क वूडने पंतला माघारी पाठवलं.
IND vs ENG : ऋषभ पंतचा सल्ला कोहलीनं नाकारला, टीम इंडियाला फटका! VIDEO
रविंद्र जडेजानं एक बाजू लावून धरत 40 रनची खेळी केली. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने (James Anderson) सर्वाधिक 5 विकेट घेतल्या, तर ओली रॉबिनसन (Ollie Robinson) आणि मार्क वूडला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. मोईन अलीला एक विकेट घेण्यात यश आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, India vs england