IND vs ENG : ...म्हणून भारत-इंग्लंडचे खेळाडू लाल टोपी घालून मैदानात उतरले सिराजचे इंग्लंडला दोन धक्के सिराजच्या आग्रहामुळे कोहलीचे दोन रिव्यू वाया गेले. त्यापूर्वी सिराजनेच लागोपाठ दोन बॉलवर इंग्लंडच्या दोन बॅट्समनना माघारी धाडलं. 15 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला सिराजने डॉमनिक सिबलीची (Dominic Sibley) विकेट घेतली, तर यानंतर पुढच्याच बॉलला त्याने हसीब हमीदला (Haseeb Hameed) बोल्ड केलं. सिबली 11 रन करून आऊट झाला, त्याचा कॅच केएल राहुलने पकडला. पाच वर्षांनंतर टीममध्ये पुनरागमन करणाऱ्या हसीब हमीदने निराशा केली. पहिल्याच बॉलला हमीद बोल्ड झाला. झॅक क्रॉलेच्याऐवजी हमीदला संधी देण्यात आली होती, पण या संधीचं त्याला सोनं करता आलं नाही.Mohammad Siraj convinced Virat Kohli to take the review of Joe Root, but Rishabh Pant was denying. pic.twitter.com/WepEASpDWH
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 13, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, India vs england