जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / टीम इंडियाचा वर्ल्ड कप विजेता खेळाडू CPL 2021 मध्ये खेळणार!

टीम इंडियाचा वर्ल्ड कप विजेता खेळाडू CPL 2021 मध्ये खेळणार!

टीम इंडियाचा वर्ल्ड कप विजेता खेळाडू CPL 2021 मध्ये खेळणार!

आयपीएल स्पर्धेचे (IPL 2021) उर्वरित सामने सुरु होण्यापूर्वी क्रिकेट फॅन्सना कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL) स्पर्धेचा थरार अनुभवयाला मिळणार आहे. या स्पर्धेत एक भारतीय देखील सहभागी होणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 29 मे : आयपीएल स्पर्धेचे (IPL 2021) उर्वरित सामने सुरु होण्यापूर्वी क्रिकेट फॅन्सना कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL) स्पर्धेचा थरार अनुभवयाला मिळणार आहे. वेस्ट इंडिजमधील टी20 लीग असलेली ही स्पर्धा 28 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. यंदा सीपीएल स्पर्धेत टी 20 क्रिकेटचा युनिव्हर्सल बॉस असलेल्या ख्रिस गेलचं (Chris Gayle) पुनरागमन झाले आहे. त्याचबरोबर शाकिब अल हसन, फाफ ड्यू प्लेसी, ख्रिस मॉरीस आणि इम्रान ताहीर सारखे दिग्गज विदेशी खेळाडू या स्पर्धेत खेळणार आहेत. टीम इंडियाच्या अंडर-19 वर्ल्ड कप विजेत्या टीमचा सदस्य समित पटेल (Smit Patel) हा देखील सीपीएलमध्ये खेळणार आहे. समितला बार्बोडसच्या टीमने करारबद्ध केले आहे. सीपीएलच्या या सिझनमध्ये खेळणारा तो एकमेव भारतीय खेळाडू असेल. यापूर्वी प्रवीण तांबे शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) TKR टीमकडून मागच्या वर्षी खेळला होता. यंदा त्याला वगळण्यात आले आहे. कोण आहे समित पटेल? समित पटेल 2012 साली झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा सदस्य होता. फायनल मॅचमध्ये पटेलने 62 रनची खेळी केली होती. त्याने कॅप्टन उन्मुक्त चंदसोबत शतकी भागिदारी केली होती.या भागिदारीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्सने पराभव करत विजेतेपद पटकावले होते. पटेल यापूर्वी गुजरात, गोवा, त्रिपुरा आणि बडोद्याकडून क्रिकेट खेळला आहे. तो यावर्षी बडोद्याकडून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही खेळला आहे. 28 वर्षांच्या पटेलने 28 टी20 मॅचमध्ये चार अर्धशतकांच्या जोरावर 708 रन काढले आहेत.  त्याचबरोबर त्याने 24 विकेट्स देखील घेतल्या आहेत. विराट कोहलीनंतर ‘हा’ खेळाडू कॅप्टन होईल, निवड समितीच्या माजी अध्यक्षांचा दावा सीपीएल स्पर्धेतील सर्व 33 मॅच सेंट किट्समधील वॉर्नर पार्कमध्ये होणार आहेत. या स्पर्धेत सहा टीममधील 101 खेळाडू खेळणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात