मुंबई, 10 जुलै : भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील वन-डे आणि टी 20 मालिकेला कोरोनाचा फटका बसला आहे. या मालिकेला 13 जुलै रोजी सुरुवात होणार होती. पण, यजमान श्रीलंकेच्या कॅम्पमधील दोन जणांना कोरोनाची लागण झाल्यानं ही मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा (Jay Shah) यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
श्रीलंकेची टीम काही दिवसांपूर्वीच इंग्लंडहू परतली आहे. इंग्लंडहून परतल्यानंतर श्रीलंकन टीमची करोना चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये श्रीलंकेचे बॅटींग कोट ग्रँट फ्लॉवर (Grant Flower) आणि सपोर्ट स्टाफ जीटी निराशेन (GT Niroshan) या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. त्यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डानं (SLC) या मालिकेचं वेळापत्रक बदलण्याची विनंती बीसीसीआयला (BCCI) केली होती. बीसीसीआयनं ती विनंती मान्य केली.
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील वन-डे मालिका 13 जुलैच्या ऐवजी 18 जुलै रोजी सुरु होणार आहे. बीसीसीय सचिव जय शहा यांनी पीटीआयला ही माहिती दिली आहे. या मालिकेचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल.
India-Sri Lanka ODI series to start on July 18 due to COVID-19 outbreak in home team camp: BCCI secretary Jay Shah to PTI
— Press Trust of India (@PTI_News) July 10, 2021
बीसीसीआयची मागणी मान्य
श्रीलंका टीममध्ये कोरोनाचा शिरकाव होताच बीसीसीआयनं श्रीलंकन क्रिकेटपटूंचे हॉटेल बदलण्यात यावे अशी मागणी केली होती. या मागणीनंतर श्रीलंकेच्या सर्व खेळाडूंना कोलंबोतील ग्रँड सिनामन हॉटेलमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. यापूर्वी दोन्ही टीम ताज समुद्रा हॉटेलमध्ये एकत्र होत्या. टीम इंडियाच्या कोणत्याही सदस्याला शिरकाव होऊ नये म्हणून बीसीसीआयनं ही विनंती केली होती. आता श्रीलंका टीमचे नवे हॉटेल भारतीय क्रिकेट टीमच्या हॉटेलपासून 1.5 किलोमीटर दूर आहे.
Good News! हरभजन सिंग- गीता बसरा दुसऱ्यांदा बनले आई-बाबा
श्रीलंका बोर्ड होणार मालामाल
भारताविरुद्धच्या सीरिजनंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाला तब्बल 90 कोटी मिळणार आहेत. 'आम्ही सुरुवातीला 3 सामन्यांचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र बीसीसीआयशी झालेल्या चर्चेनंतर सामन्यांची संख्या 6 पर्यंत वाढवण्यात आम्ही यशस्वी ठरलो. यामुळे बोर्डाच्या महसूलात अतिरिक्त 6 दशलक्ष डॉलर्सची भर पडणार आहे,' अशी माहिती श्रीलंका क्रिकेट श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शम्मी सिल्वा (Shammi Silva) यांनी काही दिवसांपूर्वीच दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, India Vs Sri lanka