मुंबई, 10 जुलै : टीम इंडियाचा ऑफ स्पिनर हरभजन सिंग (Harbhajan Singh) दुसऱ्यांदा बाबा बनला आहे. हरभजनची पत्नी गीता बसरा (Geeta Basra) हिनं मुलाला जन्म दिलाय. हरभजननं ट्विटरच्या माध्यमातून ही गोड बातमी सर्वांना शेअर केली आहे. आई आणि मुलगा दोघांचीही तब्येत उत्तम असल्याचं हरभजननं म्हंटलं आहे. हरभजननं जुलै महिन्यात आपल्या घरी नवा पाहुणा येणार असल्याचं यापूर्वीच जाहीर केलं होतं. टीम इंडियाचा क्रिकेटपटू शिखर धवनसह (Shikhar Dhawan) अनेकांनी हरभजनचं अभिनंदन केलं आहे.
Blessed with a Baby boy 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙 shukar aa Tera maalka 🙏🙏 pic.twitter.com/dqXOUmuRID
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) July 10, 2021
जाहिरात
हरभजन आणि गीता बसरानं बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर 29 ऑक्टोबर 2015 रोजी लग्न केले होते. त्यांना 5 वर्षांची एक मुलगी असून तिचे नाव हिनाया आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.