मुंबई, 5 जुलै: भारत विरुद्ध इंग्लंड
(IND W vs ENG W) यांच्यातील तिसरी वन-डे टीम इंडियानं 4 विकेट्सनं जिंकली. कॅप्टन मिताली राजनं
(Mithali Raj) नाबाद 75 रनमुळे भारताला या मालिकेतील पहिला विजय मिळवता आला. या खेळीच्या दरम्यान मितालीनं महिला क्रिकेटच्या सर्व प्रकारात सर्वात जास्त रन करणारी बॅटर हा विक्रम देखील केला. या सर्व कामगिरीनंतरही मिताली राजच्या खेळावर आक्षेप घेतले जातात.
‘वन-डे क्रिकेटमध्ये खेळताना मितालीचा स्ट्राईक रेट कमी आहे,’ असा टिकाकारांचा आक्षेप आहे. तिसऱ्या वन-डेनंतर पत्रकारांशी बोलताना मितालीनं या आक्षेपाला उत्तर दिले. “माझ्या स्ट्राईक रेटबद्दल होत असलेली टिका मी वाचली आहे. मला लोकांना काही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. मी बराच काळापासून क्रिकेट खेळत आहे. टीममधील माझी जबाबदारी मला माहिती आहे. माझं काम लोकांना खूश ठेवणे ही नाही. टीम मॅनेजमेंटनं दिलेलं काम पूर्ण करणं हे माझं टार्गेट आहे.एखाद्या टार्गेटचा पाठलाग करताना आक्रमक खेळ करण्यासाठी योग्य बॉलर्सची निवड तसेच स्वत:च्या क्षमतेवर विश्वास या गोष्टी आवश्यक आहेत.” असे मितालीने सांगितले.
मितालीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीला 22 वर्ष पूर्ण झाले आहेत. या कालाधीनंतरही रन काढण्याची आपली भूक कायम असल्याचं तिनं सांगितलं. पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये टीमला नव्या उंचीवर नेण्याचा आपला प्रयत्न आहे. माझा आजवरचा प्रवास सोपा नव्हता. यामध्ये अनेक आव्हानं होती. मी अनेक परीक्षांना सामोरं गेले. पण या सर्व आव्हांनाचा खास उद्देश होता, असं मी मानते.” असे मिताली म्हणाली.
मोहम्मद अझहरुद्दीन पुन्हा बनला HCA चा कॅप्टन, 2 आठवड्यांपूर्वी झाली होती हकालपट्टी
आजही सुधारणेला वाव
"आजवरच्या प्रसंगात असेही काही क्षण आले की त्यावेळी मला वाटले की आता बस झाले, तरीही काही तरी होते ज्यामुळे मी खेळत राहिले. मला आंतररष्ट्रीय क्रिकेटमध्ये 22 वर्ष पूर्ण झाली आहेत. या कालावधीनंतरही रन काढण्याची माझी भूक कमी झालेली नाही. मी आजही त्याच जिद्दीनं खेळण्यासाठी मैदानात उतरते. भारतासाठी मॅच जिंकणे हेच माझे ध्येय आहे. माझ्या बॅटींगमध्ये आजही सुधारणेला वाव आहे, असं मला वाटतं. मी त्यासाठी काम करत आहे.” असे मितालीने यावेळी स्पष्ट केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.