जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : टीम इंडियाच्या ऑल राऊंडरचं 5 महिन्यानंतर दमदार पुनरागमन! लिलावात मिळणार मोठा भाव

IPL 2022 : टीम इंडियाच्या ऑल राऊंडरचं 5 महिन्यानंतर दमदार पुनरागमन! लिलावात मिळणार मोठा भाव

IPL 2022 : टीम इंडियाच्या ऑल राऊंडरचं 5 महिन्यानंतर दमदार पुनरागमन! लिलावात मिळणार मोठा भाव

टीम इंडियाचा ऑफ स्पिनर वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) याने दमदार पुनरागमन केलं आहे. वेस्ट इंडिज विरूद्ध रविवारी झालेल्या पहिल्या वन-डेमध्ये त्याने 3 विकेट्स घेतल्या.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 7 फेब्रुवारी : टीम इंडियाचा ऑफ स्पिनर वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) याने दमदार पुनरागमन केलं आहे. वेस्ट इंडिज विरूद्ध रविवारी झालेल्या पहिल्या वन-डेमध्ये त्याने 3 विकेट्स घेतल्या. सुंदर बोटाला झालेल्या दुखापतीमुळे 5 महिने क्रिकेटपासून दूर होता. त्यातच कोरोनाची लागण झाल्यानं त्याला दक्षिण आफ्रिकेतील वन-डे मालिकेतही खेळता आले नव्हते. सुंदरनं या मोठ्या ब्रेकनंतर दमदार पुनरागमन केलं आहे. सुंदरनं या मॅचनंतर पत्रकार परिषदेत सांगितलं की, ‘माझ्यासमोर अनेक आव्हानं होती. मी ब्रेकमध्ये खेळात सुधारणा करण्यासाठी जे करणे शक्य आहे, ते केले. माझ्या हातामध्ये तेच होते.’ असे स्पष्ट केले. सुंदरची ही कामगिरी आगामी आयपीएल ऑक्शनमध्ये निर्णायक ठरणार आहे. याच आठवड्यात 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरूमध्ये आयपीएल ऑक्शन (IPL 2022 Mega Auction) होणार आहे. सुंदर यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) टीममध्ये होता. त्याला आरसीबीने रिटेन केले नाही. त्यानंतर तो आता ऑक्शनसाठी उपयुक्त आहे. सुंदरमध्ये पॉवर प्लेमध्ये बॉलिंग करण्याची क्षमता आहे. त्याचबरोबर तो उपयुक्त बॅटर आहे. त्यामुळे त्याच्या खेळाकडं सर्व आयपीएल फ्रँचायझींचं लक्ष आहे. सुंदरनं आपण दुखापतीच्या ब्रेकमध्येही क्रिकेटचा टच सुटलेला नसल्याचं दाखवून दिलं आहे. त्यामुळे त्याला आगामी ऑक्शनमध्ये चांगला भाव मिळणार हे नक्की आहे. पहिल्या सामन्यात रोहित शर्माने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. भारतीय स्पिनर्ससमोर वेस्ट इंडिजच्या बॅटिंगने (India vs West Indies 1st ODI) लोटांगण घातलं. 176 रनवर वेस्ट इंडिजचा ऑल आऊट झाला. युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) 4 तर वॉशिंग्टन सुंदरने 3 विकेट घेतल्या. प्रसिद्ध कृष्णाला 2 आणि मोहम्मद सिराजला एक विकेट घेण्यात यश आलं. IPL 2022 : युजवेंद्र चहलची घरवापसी होणार? रोहित शर्माने दिले संकेत, VIDEO वेस्ट इंडिजने दिलेल्या 177 रनच्या आव्हानाचा पाठलाग भारताने 28 ओव्हरमध्येच 4 विकेट गमावून केला. भारताची सुरूवात चांगली झाली. रोहित शर्मा आणि इशान किशन यांच्यात 13 ओव्हरमध्ये 84 रनची पार्टनरशीप केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात