मुंबई, 19 फेब्रुवारी : भारत विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या टी20 मॅचपूर्वी (India vs West Indies) बीसीसीआनं मोठा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) 10 दिवसांचा ब्रेक देण्यात आला असून तो आता घरी रवाना झाला आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिले आहे. विराट कोहलीला 10 दिवसांचा बायो-बबल ब्रेक देण्यात आल्याचं वृत्त आहे. त्यामुळे श्रीलंका विरूद्ध होणाऱ्या टी20 सीरिजसाठीही तो उपलब्ध नसेल. विराटनं शुक्रवारच्या मॅचमध्ये 52 रनची खेळी करत आपण पुन्हा फॉर्मात येत असल्याचे संकेत दिले. विराटने त्याच्या या खेळीमध्ये 7 फोर आणि एक सिक्स लगावला. टी-20 आंतरराष्ट्रीयमधली विराटची ही 89 वी इनिंग होोती. नाबाद 94 रन हा त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे, तसंच विराटची सरासरी 52 ची आणि स्ट्राईक रेट 138 चा आहे. विराटच्या नावावर टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 3,296 रन आहेत. विराट कोहलीला (Virat Kohli) टी-20 सीरिजमधून विश्रांती दिली जाणार आहे, पण तो टेस्ट सीरिज खेळणार आहे. या सीरिजची पहिली टेस्ट विराटची 100 वी टेस्ट असेल. सोबतच ऑलराऊंडर रवींद्र जडेजादेखील (Ravindra Jadeja) फिट झाला आहे, त्यामुळे त्याचंही टीममध्ये पुनरागमन होणार आहे. न्यूझीलंडच्या बॉलरनं रचला इतिहास, फक्त 3 दिवसांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव भारत-श्रीलंका सीरिजचं वेळापत्रक पहिली टी20- 24 फेब्रुवारी, लखनऊ दुसरी टी20- 26 फेब्रुवारी, धर्मशाला तिसरी टी20- 27 फेब्रुवारी, धर्मशाला पहिली टेस्ट- 4-8 मार्च, मोहाली दुसरी टेस्ट (डे-नाईट) - 12-16 मार्च, बँगलोर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







