मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SL: शिखर धवननं केले 6 मोठे record, कोहली आणि धोनीला टाकलं मागं

IND vs SL: शिखर धवननं केले 6 मोठे record, कोहली आणि धोनीला टाकलं मागं

शिखर धवननं (Shikhar Dhawan) जोरदार विजयासह कॅप्टनसीची सुरूवात केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वन-डेमध्ये (India vs Sri Lanka) शिखर धवननं 6 मोठे रेकॉर्ड केले आहेत.

शिखर धवननं (Shikhar Dhawan) जोरदार विजयासह कॅप्टनसीची सुरूवात केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वन-डेमध्ये (India vs Sri Lanka) शिखर धवननं 6 मोठे रेकॉर्ड केले आहेत.

शिखर धवननं (Shikhar Dhawan) जोरदार विजयासह कॅप्टनसीची सुरूवात केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वन-डेमध्ये (India vs Sri Lanka) शिखर धवननं 6 मोठे रेकॉर्ड केले आहेत.

कोलंबो, 19 जुलै: शिखर धवननं (Shikhar Dhawan) जोरदार विजयासह कॅप्टनसीची सुरूवात केली आहे. टीम इंडियानं पहिल्या वन-डेमध्ये श्रीलंकेचा (India vs Sri Lanka) 7 विकेट्सनं पराभव केला. धवननं या मॅचमध्ये नाबाद 86 रनची खेळी केली. या विजयासोबतच टीम इंडियानं मालिकेत 1-0 नं आघाडी घेतली आहे. श्रीलंका दौऱ्यावर संपूर्ण नवी टीम आल्यानं हा विजय जास्त महत्त्वाचा आहे. पहिल्या मॅचमध्ये शिखरनं 6 मोठे रेकॉर्ड केले. काय आहेत ते रेकॉर्ड पाहूया

1 - शिखर धवननं श्रीलंका विरुद्ध वन-डे क्रिकेटमध्ये 1 हजार रन पूर्ण केले. त्याने सर्वात 17 इनिंगमध्ये हा टप्पा ओलांडला आहे. हाशिम अमला (18), टीम इंडियाचे माजी कॅप्टन सौरव गांगुली (20), महेंद्रसिंह धोनी (22) आणि विराट कोहली (24) यांना त्याने मागे टाकलं आहे.

2 - शिखर धवननं कॅप्टन म्हणून पहिल्याच इनिंगमध्ये 86 रन काढले. भारतीय कॅप्टन म्हणून पहिल्या वन-डे इनिंगमध्ये सर्वात जास्त  रन करण्याच्या बाबतीत धवन आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकरनं कॅप्टन म्हणून श्रीलंकेच्या विरुद्ध 110 रन काढले होते.

3 - शिखर धवननं वन-डे क्रिकेटमध्ये 6 हजार रन पूर्ण केले आहेत. धवननं 144 इनिंगमधे हे रन पूर्ण केले. त्याने वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू व्हिव रिचर्ड्स (141) आणि सौरव गांगुली (147) यांना मागं टाकलं.

4 - शिखर धवननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (टेस्ट, वन-डे आणि टी20) 10 हजार रन पूर्ण केले आहेत. ही कामगिरी करणारा तो 14 वा भारतीय क्रिकेटपटू आहे. भारताकडून सचिन तेंडुलकरनं सर्वात जास्त 34357 रन केले आहेत.

5-  शिखर धवननं ओपनिंग बॅट्समन म्हणूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (टेस्ट, वन-डे आणि टी20) 10 हजार रन पूर्ण केले आहेत. ही कामगिरी करणारा तो फक्त 5 वा भारतीय आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा आणि सुनील गावसकर यांनी हा टप्पा ओलांडला आहे.

‘त्या’ घटनेनं लक्ष्य विचलित झालं, ‘मॅन ऑफ द मॅच’ पृथ्वीचा खुलासा

6) शिखर धवननं वन-डे क्रिकेटमध्ये टीम इंडियाची कॅप्टनसी करणारा सर्वात वयस्कर क्रिकेटपटू बनला आहे. त्याला 35 वर्ष 225 दिवस पूर्ण झाल्यावर ही संधी मिळाली.

First published:

Tags: Cricket news, India Vs Sri lanka, MS Dhoni, Shikhar dhavan, Virat kohli