• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs SL: ‘त्या’ घटनेनं लक्ष्य विचलित झालं, ‘मॅन ऑफ द मॅच’ पृथ्वीचा खुलासा

IND vs SL: ‘त्या’ घटनेनं लक्ष्य विचलित झालं, ‘मॅन ऑफ द मॅच’ पृथ्वीचा खुलासा

टीम इंडियाचा तरुण बॅट्समन पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने आक्रमक सुरुवात करत 43 रन काढले. या खेळीबद्दल त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला. या खेळीच्या दरम्यान घडलेल्या एका घटनेमुळे आपले लक्ष्य विचलित झाले असे पृथ्वीने मान्य केले.

 • Share this:
  कोलंबो, 19 जुलै : टीम इंडियानं शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) खेळीच्या जोरावर श्रीलंकेचा पहिल्या वन-डे मध्ये 7 विकेट्सनं पराभव केला. याबरोबरच टीम इंडियानं 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताचा तरुण बॅट्समन पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने आक्रमक सुरुवात करत 43 रन काढले. या खेळीबद्दल त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला. या खेळीच्या दरम्यान घडलेल्या एका घटनेमुळे आपले लक्ष्य विचलित झाले असे पृथ्वीने मान्य केले. श्रीलंकेने ठेवलेल्या 263 रनच्या आव्हानाचा पाठलाग भारताने 36.4 ओव्हरमध्येच 3 विकेट गमावून केला. कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) 95 बॉलमध्ये 86 रनवर नाबाद राहिला. आपली पहिलीच वनडे मॅच खेळणाऱ्या इशान किशनने (Ishan Kishan) 42 बॉलमध्ये 59 रनची खेळी केली. सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 20 बॉलमध्ये 31 रनची नाबाद खेळी केली. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) 43 रनवर आणि मनिष पांडे (Manish Pandey) 26 रनवर आऊट झाले. मॅच संपल्यानंतर पृथ्वीने सांगितले की, ‘राहुल (द्रविड) सरांनी मला काही सांगितले नव्हते. मी माझा पद्धतीनं विचार करुन मैदानात उतरलो होतो. मी खराब बॉलची वाट पाहिली. टीमचा स्कोर वाढवणे आणि क्रिझवर टिकून राहणे हे माझे लक्ष्य होते. हे पिच चांगले होते. पहिल्या इनिंगमध्येही चांगले होते. दुसऱ्या इनिंगमध्ये आणखी चांगले झाले.’ या खेळीच्या दरम्यान पृथ्वीच्या हेल्मेटला बॉल लागला होता. त्यावर आता सर्व ठीक आहे, असे पृथ्वीने स्पष्ट केले. मी खेळाचा आनंद घेत होता. डोक्यावर बॉल लागल्यानं माझं लक्ष थोडं विचलित झालं असेल, हे पृथ्वीनं मान्य केलं. इंग्लंडच्या खेळाडूनं मारला सर्वात मोठा सिक्स! पाकिस्तानला बसला धक्का, पाहा VIDEO पाचव्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर दुष्मंता चामिराचा बॉल (Dushmantha Chamira) पृथ्वी शॉच्या हेल्मेटवर लागला होता. तो बॉल टोलावण्याचा पृथ्वीचा प्रयत्न फसला आणि त्याच्या हेल्मेटला लागून बाऊंड्रीच्या बाहेर गेला. या घटनेनं पृथ्वी शॉचं लक्ष विचलित झालं. त्यानंतर पुढच्या ओव्हरमध्ये धनंजया डी सिल्वाने त्याला आऊट केले.
  Published by:News18 Desk
  First published: