• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • 'ये शाम मस्तानी...' श्रीलंका दौऱ्यात पृथ्वी आणि गब्बरची रंगली संध्याकाळ! पाहा VIDEO

'ये शाम मस्तानी...' श्रीलंका दौऱ्यात पृथ्वी आणि गब्बरची रंगली संध्याकाळ! पाहा VIDEO

श्रीलंका दौऱ्यावरील टीम इंडियाचा कॅप्टन शिखर धवन (Shikhar Dhawan) सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो. धवननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केलाय. तो व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल (Video Viral) झाला आहे.

 • Share this:
  मुंबई, 16 जुलै : श्रीलंका दौऱ्यावरील टीम इंडियाचा कॅप्टन शिखर धवन (Shikhar Dhawan) सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो. भारतीय टीममध्ये गब्बर या नावाने प्रसिद्ध असलेला धवन फॅन्ससोबत नेहमी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. धवननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केलाय. तो व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल (Video Viral) झाला आहे. शिखर धवन या व्हिडीओत बासरी वाजवतोय. तर त्याच्या जवळ उभा असलेला टीम इंडियाचा बॅट्समन पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) कटी पतंग  सिनेमातील 'ये शाम मस्तानी मदहोश  किए जाए...' हे गाणं गात आहे. धवन आणि पृथ्वी हे दोघंही सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात धवन टीमचा कॅप्टन असून राहुल द्रविड (Rahul Dravid) कोच आहे. शिखर धवननं या पोस्टला 'थर्सडे ट्यून्स, आमचा इन हाऊस सुपरस्टार गायक पृथ्वी शॉ सोबत,' असं कॅप्शन दिलं असून पृथ्वीला या पोस्टमध्ये त्याने टॅग देखील केलं आहे.
  IND vs ENG : टीम इंडियाला कोरोनाचा फटका बसल्यानंतरही ECB चा धक्कादायक निर्णय! लंका दौऱ्यात भारतीय टीम तीन वनडेमधली पहिली वनडे 18 जुलैला खेळेल. तर 25 जुलैपासून तीन टी-20 मॅचच्या सीरिजला सुरुवात होईल. सीरिजच्या सगळ्या मॅच कोलंबोच्या आर.प्रेमदासा स्टेडियममध्य खेळवल्या जाणार आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: