Home /News /sport /

IND vs SL: खराब कामगिरीनंतरही Hardik Pandya hit, 'या' कारणामुळे जिंकलं फॅन्सचं मन! VIDEO

IND vs SL: खराब कामगिरीनंतरही Hardik Pandya hit, 'या' कारणामुळे जिंकलं फॅन्सचं मन! VIDEO

पहिल्या टी20 सामन्यात टीम इंडियानं श्रीलंकेचा (India vs Sri Lanka) 38 रननं सहज पराभव केला. ऑल राऊंडर हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) या सामन्यात निराशा केली. या निराशाजनक कामगिरीनंतरही तो एका खास कारणामुळे चर्चेत होता.

    कोलंबो, 26 जुलै: श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियाची (Team India) दमदार कामगिरी सुरु आहे. रविवारी झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात टीम इंडियानं श्रीलंकेचा  (India vs Sri Lanka) 38 रननं सहज पराभव केला. या विजयाबरोबर तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता मंगळवारी होणारा दुसरा सामना जिंकून ही मालिका जिंकण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. ऑल राऊंडर हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) या सामन्यात निराशा केली. या निराशाजनक कामगिरीनंतरही तो एका खास कारणामुळे चर्चेत होता. पिचवर फार कमाल न करणाऱ्या हार्दिकनं मॅच सुरु होण्यापूर्वीच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या मॅचपूर्वी प्रथेनुसार दोन्ही टीमचं राष्ट्रगीत झालं. श्रीलंकेचं राष्ट्रगीत सुरु असताना हार्दिक देखील ते राष्ट्रगीत म्हणत होता. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) झाला आहे. एखाद्या क्रिकेटपटूनं प्रतिस्पर्धी टीमचं राष्ट्रगीत गाण्याची ही पहिलीच वेळ असावी. हार्दिकच्या या कृतीची क्रिकेट फॅन्सनी जोरदार प्रशंसा केली आहे. रविवारच्या सामन्यात पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. पहिल्याच बॉलला भारताला धक्का बसला. ओपनर पृथ्वी शॉ शून्य रनवर माघारी परतला. कर्णधार शिखर धवन आणि संजू सॅमसन यांनी भारताचा डाव सावरला, पण संजू सॅमसन 27 रनची चांगली सुरुवात मिळाल्यानंतर आऊट झाला, तर शिखर धवन 46 रन करून माघारी परतला. हार्दिक पांड्याला 12 बॉलमध्ये 10 रन करता आले. इशान किशन 14 बॉलमध्ये 20 रनवर आणि कृणाल पांड्या 3 रनवर नाबाद राहिले. Tokyo Olympics: पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये तलवार गाजवणारी भवानी देवी कोण आहे? भारताने ठेवलेल्या 165 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ  126 रनवर ऑल आऊट झाला. नडे सीरिजमध्ये संघर्ष करणाऱ्या भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) टी-20 सीरिजमध्ये सूर गवसला. भुवीने 3.3 ओव्हरमध्ये 22 रन देऊन 4 विकेट घेतल्या, तर दीपक चहरने 2 विकेट मिळवल्या. कृणाल पांड्या, वरुण चक्रवर्ती, युझवेंद्र चहल आणि हार्दिक पांड्या यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. श्रीलंकेकडून चरीथ असलंकाने सर्वाधिक 44 रन केले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Hardik pandya, India Vs Sri lanka

    पुढील बातम्या