मुंबई, 9 जुलै: शिखर धवनच्या (Shikhar Dhwan) कॅप्टनसीमध्ये टीम इंडिया (Team India) सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. दोन्ही देशांची मालिका 13 जुलैपासून सुरु होत आहे. ही टीम इंडिया दुय्यम दर्जाची आहे, अशी टीका श्रीलंकेचा माजी कॅप्टन अर्जुन रणतुंगानं (Arjuna Ranatunga) केली होती. रणतुंगाच्या या टीकेला त्याचा श्रीलंकन टीममधील भरवशाचा सहकारी आणि दिग्गज क्रिकेटपटू अरविंद डिसल्वानं (Arvinda De Silva) चोख उत्तर दिलं आहे.
या दौऱ्यावर आलेल्या भारतीय क्रिकेट टीमला दुय्यम समजणे चूक आहे, असं श्रीलंका क्रिकेट टीमचे संचालक डी सिल्वा यांनी स्पष्ट केले. 'भारतीय टीममध्ये अनेक चांगले खेळाडू आहेत. या टीमला दुय्यम टीम समजणे चूक आहे. ही टीम कुणापेक्षाही कमी नाही. खरं सांगायचं तर या टीमला पराभूत करणे हे आव्हान आहे. आम्ही त्यांना पराभूत करु शकलो तर टी 20 वर्ल्ड कपपूर्वी हे आमच्यासाठी मोठं यश असेल. त्यामुळे आमच्या आत्मविश्वासात मोठी वाढ होईल.'
'कोरोना महामारीमुळे बदललेल्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या टीम पाठवणे हे आता आवश्यक आहे. क्वारंटाईनचे नियम आणि बायो-बबल यामुळे खेळाडूंना येत असलेल्या थकव्यामुळे हे आवश्यक आहे. फक्त भारतच नाही तर भविष्यात अन्य टीम देखील या प्रकारे खेळाडूंना रोटेट करतील.माझ्यामते दोन टीम हेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं भविष्य असेल.' असे त्यांनी स्पष्ट केले.
भारताविरुद्ध खेळल्यानंतर श्रीलंका बोर्ड मालामाल, एका मॅचचे मिळणार 'इतके' कोटी
काय म्हणाला होता रणतुंगा?
भारताने दुय्यम दर्जाची टीम पाठवणं हा अपमान आहे, असं रणतुंगा म्हणाला होता. 'भारताने दुसऱ्या श्रेणीची टीम पाठवणं हा आमच्या क्रिकेटचा अपमान आहे. टीव्ही आणि मार्केटिंगच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही सीरिज खेळवायला तयार झालेल्या श्रीलंका क्रिकेट बोर्डाला मी दोषी मानतो. श्रीलंका क्रिकेटसाठी हे लाजीरवाणं आहे. भारताने त्यांची सर्वोत्तम टीम इंग्लंडला पाठवली आहे, तर दुय्यम टीम इकडे खेळणार आहे,' असं रणतुंगा म्हणाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, India Vs Sri lanka, Sports