कोलंबो, 30 जुलै: श्रीलंकेनं तिसऱ्या वन-डेमध्ये
((IND vs SL) टीम इंडियाचा 7 विकेट्सनं पराभव करत मालिका 2-1 ने जिंकली. टीम इंडियानं पहिल्यांदा बॅटींग करताना फक्त 81 रन काढले. श्रीलंकेनं हे लक्ष्य तीन विकेट्सच्या मोबदल्यात आरामात पूर्ण केले. श्रीलंकेकडून लेग स्पिनर वानिंदू हासारंगानं
(Wanindu Hasaranga) 4 ओव्हर्समध्ये 9 रन देत 4 विकेट्स घेतल्या. यापूर्वी टीम इंडियानं वन-डे मालिकेत श्रीलंकेचा 2-1 नं पराभव केला होता. टी20 मालिकेत श्रीलंकेनं त्याची परतफेड केली आहे.
वानिंदू हासारंगाचा गुरुवारी 24 वा वाढदिवस होता. त्याच दिवशी त्यानं एका ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली आहे. 9 रनमध्ये 4 विकेट्स हे टीम इंडियाविरुद्ध कोणत्याही बॉलरनं केलेलं सर्वोत्तम प्रदर्शन आहे. 13 देशांच्या 455 बॉलर्सना जे जमलं नाही ते हासारंगानं करुन दाखवलं आहे. यापूर्वी 2016 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडच्या मिचेल सेंटनरनं नागपूरमध्ये भारताविरुद्ध 11 रन देत 4 विकेट्स घेतल्या होत्या.
हासारंगाचं हे टी20 कारकिर्दीमधील सर्वोत्तम प्रदर्शन आहे. त्याने यापूर्वी याच वर्षी मार्च महिन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध 12 रन देत 3 विकेट्स घेतल्या होत्या. हासरंगानं टी20 कारकिर्दीमध्ये 22 मॅचमध्ये 14 च्या सरासरीनं 33 विकेट्स घेतल्या असून त्याचा इकॉनॉमी रेट 6.50 च्या आसपास आहे. त्याचबरोबर त्यानं 26 वन-डेमध्ये 25 आणि 4 टेस्टमध्ये 4 विकेट्स घेतल्यी आहेत. हासारंगानं वन-डेमध्ये तीन अर्धशतक देखील झळकावले आहेत.
IND vs SL : चांगल्या खेळाचं बक्षीस, श्रीलंकन खेळाडूच्या 4 IPL टीम संपर्कात
भारताची नामुश्की
टीम इंडियानं श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या टी20 सामन्यात निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 आऊट 81 रन काढले. हा टीम इंडियाचा श्रीलंकेविरुद्ध सर्वात कमी स्कोअर आहे. यापूर्वी 2006 साली पुण्यात भारतीय टीमनं 101 रन काढले होते. टी20 क्रिकेटमध्ये भारताचा हा तिसऱ्या क्रमांकाचा कमी स्कोअर आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2008 साली भारतीय टीम 74 रनच करु शकली होती. त्यानंतर 2016 साली न्यूझीलंड विरुद्ध भारतीय टीम 79 रनवरच आटोपली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.