मुंबई, 29 डिसेंबर : ऋषभ पंतनं (Rishabh Pant) दक्षिण आफ्रिका विरुद्ध सुरू असलेल्या सेंच्युरियन टेस्टच्या तिसऱ्या दिवशी स्पेशल ‘शतक’ पूर्ण केले. तो स्टंपच्या मागे सर्वात जलद 100 जणांना आऊट करणारा भारतीय विकेटकिपर बनला आहे. पंतनं 26 व्या टेस्टमध्ये हा टप्पा पूर्ण केला आहे. यापूर्वी महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि ऋद्धीमान साहा यांनी 36 व्या टेस्टमध्ये हा रेकॉर्ड केला होता. ऋषभ पंतला नुकतंच उत्तराखंड राज्याचा ब्रँड अॅम्बेसेडर बनवले आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांनी पंतचं अभिनंदन करणारं ट्विट केलं. यावेळी त्यांना पंत नेमका कोण आहे हेच माहिती नसल्याचं उघड झालं. मुख्यमंत्री धामी यांनी ट्विट केले की, ‘दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या टेस्ट मॅचमध्ये उत्तराखंडाचा सुपूत्र आणि राज्याचा ब्रँड अॅम्बेसेडर ऋषभ पंतनं सुंदर खेळ करत सर्वात फास्ट 100 विकेट्स घेणारा भारतीय विकेट किपर झाल्याबद्दल अभिनंदन.’ मुख्यमंत्र्यांच्या या ट्विटमध्ये अन्य सर्व गोष्टी ठीक आहेत, पण त्यांनी पंतचं 100 विकेट्स घेतल्याबद्दल अभिनंदन केले आहे. पण पंत हा विकेट किपर आहे, बॉलर नाही, याचा धामी यांना विसर पडल्याचं दिसत आहे.
पंत टेस्ट क्रिकेटमध्ये 100 जणांना आऊट करणारा घेणारा भारताचा सहावा विकेट कीपर आहे. धोनीने टेस्टमध्ये सर्वाधिक 294 विकेट घेतल्या, यात 256 कॅच आणि 38 स्टम्पिंगचा समावेश आहे. पंतने या टेस्टच्या आधी 25 मॅचमध्ये 89 कॅच आणि 7 स्टम्पिंग केले होते.ऋषभ पंतने मोहम्मद शमीच्या (Mohammad Shami) बॉलिंगवर टेम्बा बऊमाचा कॅच पकडला आणि हा टप्पा पूर्ण केला. Ashes Series जिंकल्यानंतरही समाधान नाही, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचं टीम इंडिया टार्गेट टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद 100 जणांना आऊट करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डिकॉकच्या (Quinton De Kock) नावावर आहे. डिकॉकने 22 टेस्टमध्ये 100 शिकार करण्याचा रेकॉर्ड केला होता.

)







