मुंबई, 18 डिसेंबर : विराट कोहलीनं (Virat Kohli) टी20 टीमची कॅप्टनसी सोडल्यानंतर त्याच्याकडून वन-डे टीमची कॅप्टनसी काढून घेण्यात आली. आता रोहित शर्मा (Rohit Sharma) या दोन्ही टीमचा कॅप्टन आहे. तर विराटकडे फक्त टेस्ट टीमची कॅप्टनसी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विराटची बॅट शांत आहे. विराट पुन्हा कधी फॉर्मात येईल आणि पूर्वीप्रमाणे रन काढेल? हा फॅन्सना प्रश्न आहे. टीम इंडियाचे माजी कॅप्टन आणि दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavsakar) याांनी याबाबत भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या मते आता विराटकडून आपल्याला मोठी खेळी पाहयला मिळणार आहे. विराटनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचं शेवटचं शतक 2019 साली लगावले होते. ते त्याचे 70 वे शतक होते. त्यानंतर त्याला सध्या 71 व्या शतकाची प्रतीक्षा आहे. ‘स्पोर्ट्स तक’ शी बोलताना गावसकर यांनी सांगितले की, ‘आता आपल्याला लवकरच 2 वर्षांपूर्वीचा विराट पाहयला मिळेल. जो एकापाठोपाठ एक शतक झळकावत असे. वन-डे आणि टी20 टीमची कॅप्टनसी गेल्यानंतर विराट मुक्तपणे खेळाचा आनंद घेऊ शकेल,’ असे त्यांनी स्पष्ट केले. सुनील गावसकर यांनी यावेळी रोहित शर्माची देखील प्रशंसा केली. ‘मुंबई इंडियन्स प्रमाणेच टीम इंडियाचाही रोहित यशस्वी कॅप्टन होईल, ’ असा विश्वास गावसकरांनी व्यक्त केला. रोहितच्या कॅप्टनसीखाली मुंबई इंडियन्सनं पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. ‘त्या सर्वांनी मिळून विराटच्या अर्ध्या मॅचही खेळल्या नाहीत’, वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूनं फटकारलं बीसीसीआयनं मागच्या आठवड्यात रोहितची वन-डे टीमचा कॅप्टन तसंच टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन म्हणून नियुक्ती केली आहे. रोहितला दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वीच दुखापत झाली. त्यामुळे तो टेस्ट सीरिजसाठी जाऊ शकला नाही. त्याच्या जागी प्रियांक पंचालची निवड करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.