मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SA : दक्षिण आफ्रिकेच्या धोकादायक त्रिकुटापासून टीम इंडियाला राहावे लागेल सावध

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेच्या धोकादायक त्रिकुटापासून टीम इंडियाला राहावे लागेल सावध

IND VS SA T20 Series: टीम इंडिया यंदा घरच्या मैदानात खेळत असली तरी त्यांना दक्षिण आफ्रिकेवर (India vs South Africa) विजय मिळवणे सोपे नाही.

IND VS SA T20 Series: टीम इंडिया यंदा घरच्या मैदानात खेळत असली तरी त्यांना दक्षिण आफ्रिकेवर (India vs South Africa) विजय मिळवणे सोपे नाही.

IND VS SA T20 Series: टीम इंडिया यंदा घरच्या मैदानात खेळत असली तरी त्यांना दक्षिण आफ्रिकेवर (India vs South Africa) विजय मिळवणे सोपे नाही.

मुंबई, 3 जून : दक्षिण आफ्रिकेची टीम पाच टी20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतामध्ये दाखल झाली आहे. 9 जून पासून ही मालिका सुरू होणार आहे. यावर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपची तयारी दोन्ही टीम या सीरिजपासून सुरू करतील. भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन संघ यावर्षामध्ये तिसऱ्यांदा आमने-सामने येत आहेत. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेत झालेली टेस्ट आणि वन-डे मालिका आफ्रिकेनं जिंकली होती.

दोन देशांमध्ये यापूर्वी झालेल्या वन-डे मालिकेत आफ्रिकेनं केएल राहुलच्या (KL Rahul) कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या भारतीय टीमचा 3-0 असा पराभव केला होता. टीम इंडिया यंदा घरच्या मैदानात खेळत असली तरी त्यांना आफ्रिकेवर विजय मिळवणे सोपे नाही. कारण, या मालिकेत विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिकेचे एकूण 16 खेळाडू आयपीएल स्पर्धेत खेळत होते. त्यामुळे त्यांना आता भारतीय वातावरणाशी जुळवून घ्यायला फार वेळ लागणार नाही. यापैकी क्विंटन डी कॉक, कागिसो रबाडा आणि डेव्हिड मिलर या तीन आफ्रिकन खेळाडूंचा टीम इंडियाला मोठा धोका आहे. यापैकी डेव्हिड मिलरची (David Miller) गुजरात टायटन्सच्या आयपीएल विजेतेपदात मोठी भूमिका होती. त्यानं या आयपीएल सिझनमध्ये 68 च्या सरासरीनं 481 रन केले आहेत. मिलरचा हा फॉर्म पाहून त्याला टॉप ऑर्डरमध्ये खेळवण्याचा विचार करत असल्याचं दक्षिण आफ्रिकेच्या कॅप्टननं जाहीर केलं आहे.

मिलरमध्ये काही बॉलमध्येच मॅचचं चित्र बदलण्याची क्षमता आहे. तर क्विंटन डी कॉकमध्ये मोठी खेळी करण्याची क्षमता आहे. त्यानं आयपीएलमधील 15 इनिंगमध्ये 508 रन केले होते. यामध्ये 140 रनच्या विशाल खेळीचा देखील समावेश आहे. या आयपीएल सिझनमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या बॅटर्सच्या यादीमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर होता.

ENG vs NZ : कॅप्टन बदलल्यानंतरही इंग्लंडचे हाल कायम, बॉलर्सच्या मेहनतीवर काही तासांमध्येच पाणी

दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फास्ट बॉलर कागिसो रबाडा देखील चांगल्याच फॉर्मात आहे. त्यानं आयपीएलमधील 13 सामन्यात 23 विकेट्स घेतल्या. तो सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या बॉलर्सच्या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होता. त्याचवेळी तो सर्वात यशस्वी फास्ट बॉलर ठरला. डी कॉकप्रमाणेच रबाडाकडंही टीम इंडियाला सुरूवातीच्या ओव्हर्समध्येच बॅकफुटवर ढकलण्याची क्षमता आहे. त्यामुळे टीम इंडियाला त्याच्यापासून सावध राहावं लागेल.

First published:

Tags: Cricket news, South africa, T20 cricket, Team india