मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेच्या 2 अनोळखी खेळाडूंनी टीम इंडियाला दिली न विसरणारी जखम

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेच्या 2 अनोळखी खेळाडूंनी टीम इंडियाला दिली न विसरणारी जखम

टीम इंडियाला आणखी एकदा दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज जिंकण्यात अपयश आले.या मालिकेपूर्वी (India vs South Africa) फार कुणाला माहिती नसलेल्या आफ्रिकेच्या दोन अनोळखी खेळाडूंनी टीम इंडियाला न विसरता येणारी जखम दिली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 15 जानेवारी : टीम इंडियाला आणखी एकदा दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज जिंकण्यात अपयश आले. तिसऱ्या टेस्टमध्ये (India vs South Africa) आफ्रिकेने भारताचा 7 विकेट्सनं पराभव केला. यजमान टीमनं 212 रनचे टार्गेट 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. या सीरिजमध्ये भारतीय टीमने सेंच्युरियन टेस्ट जिंकत चांगली सुरूवात केली होती. पण, त्यानंतर आफ्रिकेनं मालिकेत कमबॅक करत 2-1 ने विजय मिळवला. या मालिकेपूर्वी फार कुणाला माहिती नसलेल्या आफ्रिकेच्या दोन अनोळखी खेळाडूंनी टीम इंडियाला न विसरता येणारी जखम दिली आहे.

यापैकी पहिला खेळाडू आहे मार्को जेन्सन (Marco Jansen). 21 वर्षांच्या मार्कोने याच मालिकेत टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने पहिल्याच मालिकेच 103.3 ओव्हर्समध्ये 16 च्या सरासरीने 19 विकेट्स घेतल्या. तो या मालिकेतील दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी बॉलर ठरला. 31 रन देऊन 4 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली. टीम इंडियाचे अनुभवी फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) यांच्यापेक्षाही त्याने जास्त विकेट्स घेतल्या. केपटाऊनमधील निर्णायक टेस्टमध्ये 7 विकेट्स घेत त्याने विजयात महत्त्वाचे योगदान दिले.

28 वर्षांचा किगन पीटरसननं (Keegan Petersen)  या मालिकेत सर्वात जास्त रन केले. त्याने 3 टेस्टमधील 6 इनिंगमध्ये 46 च्या सरासरीने 276 रन केले. यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश आहे. पीटरसनचा अपवाद वगळता एकाही बॅटरला या मालिकेत  250 पेक्षा जास्त रन करता आले नाहीत. तिसऱ्या टेस्टमध्ये त्याने दोन्ही इनिंगमध्ये अर्धशतक झळकावले.

IND vs SA : DRS च्या वादावर विराटचे उत्तर, बाहेरच्या लोकांवर साधला निशाणा

पीटरसननं आजवर फक्त 5 टेस्ट खेळल्या आहेत. पहिल्या 5 इनिंगमध्ये एकदाही त्याला 30 रन करता आले नव्हते. मात्र त्यानंतरच्या 4 पैकी 3 इनिंगमध्ये त्याने अर्धशतक झळकावली आहेत. पीटरसनच्या नावावर आता टेस्ट क्रिकेटमध्ये 9 इनिंगनंतर 36 च्या सरासरीने 320 रन आहेत. केपटाऊन टेस्टच्या शेवटच्या इनिंगमध्ये त्याने सर्वाधिक 82 रन करत आफ्रिकेच्या हातातून विजय निसटणार नाही, याची काळजी घेतली. या कामगिरीबद्दल पीटरसनला तिसऱ्या टेस्टमधील 'मॅन ऑफ द मॅच' तसेच 'प्लेयर ऑफ द सीरिज' या दोन्ही पुरस्काराने गौरवण्यात आले.

First published:

Tags: Cricket news, South africa, Team india