मुंबई, 21 जानेवारी : दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरूवात जोरदार केल्यानंतर टीम इंडियासाठी (Team India) पुढील प्रवास निराशाजनक झाला आहे. भारतीय टीमनं या मालिकेतील पहिली टेस्ट जिंकली. त्यानंतरच्या पुढील दोन टेस्ट गमावल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचं स्वप्न अपूर्ण राहिले. त्यानंतर बुधवारी झालेल्या पहिल्या वन-डेमध्येही दक्षिण आफ्रिकेनं विजय मिळवला. या विजयासह यजमान टीमनं 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील दुसरी वन-डे आज (शुक्रवार) होणार आहे. या मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी टीम इंडियाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आजचा सामना जिंकणे आवश्यक आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरनं निराशा केली होती. विराट कोहली (Virat Kohli) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांनी अर्धशतक झळकावत विजयाच्या दिशेनं वाटचाल सुरू केली होती. पण, हे दोघं आऊट झाल्यानंतर मिडल ऑर्डर कोसळली. मिडल ऑर्डरचे अपयश हे पराभवाचे मुख्य कारण असल्याचे कॅप्टन केएल राहुलने (KL Rahul) मान्य केले होते.
टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरमधील विकेट किपर ऋषभ पंतची जागा फिक्स आहे. ऑल राऊंडर व्यंकटेश अय्यरला आणखी एक संधी मिळू शकते. त्या परिस्थितीमध्ये श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) वगळून सुर्यकुमार यादवचा (Suryakumar Yadav) टीममध्ये समावेश करण्यावर मॅनेजमेंट विचार करत आहे. सूर्याला नंबर 4 वर खेळण्याचा चांगला अनुभव आहे. त्याचा टीममध्ये समावेश करून बॅटींगमध्ये स्थिरता आणण्याचा विचार टीम मॅनेजमेंट करू शकते.
भारतीय बॉलिंगमध्ये अनुभवी भुवनेश्वर कुमारनं पहिल्या मॅचमध्ये निराशा केली आहे. भुवनेश्वर गेल्या वर्षभरापासून फॉर्मात नाहीय. भुवनेश्वरच्या जागी प्रसिद्ध कृष्णा किंवा मोहम्मद सिराजला या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे.
Axar Patel Engagement: अक्षर पटेल वाढदिवशीच झााला क्लीन बोल्ड, 'लेडी लक' मेहा कोण आहे?
टीम इंडियाची संभाव्य Playing 11 : केएल राहुल (कॅप्टन), शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव/ श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, आर. अश्विन, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार/मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि युजवेंद्र चहल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.