मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ: 'अक्षर पटेल, रविंद्र जडेजा' 2 नावांचे 4 खेळाडू, वानखेडेवरील Picture Perfect Viral

IND vs NZ: 'अक्षर पटेल, रविंद्र जडेजा' 2 नावांचे 4 खेळाडू, वानखेडेवरील Picture Perfect Viral

टीम इंडियानं (Team India) मुंबई टेस्टमध्ये न्यूझीलंडचा मोठा पराभव करत होम ग्राऊंडवर सलग 14 वी टेस्ट सीरिज जिंकली आहे. मुंबई टेस्टनंतर टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर. अश्निननं (R. Ashwin) एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 6 डिसेंबर : टीम इंडियानं (Team India) मुंबई टेस्टमध्ये न्यूझीलंडचा मोठा पराभव करत होम ग्राऊंडवर सलग 14 वी टेस्ट सीरिज जिंकली आहे. न्यूझीलंडची टीम सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन आहे. त्यांना आजवर भारतामध्ये एकदाही टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही. या सीरिजमधील कानपूरमध्ये झालेली पहिली टेस्ट ड्रॉ झाली होती. त्यानंतर मुंबईमध्ये न्यूझीलंडला मोठी संधी होती. पण, भारतीय टीमनं कामगिरी उंचावत त्यांना कोणतीही संधी दिली नाही. मुंबई टेस्टनंतर टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर. अश्निननं (R. Ashwin) एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये अक्षर पटेल (Axar Patel), एजाझ पटेल (Ajaz Patel), रचिन रविंद्र (Rachin Ravindra) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) हे चार खेळाडू खास स्टाईलने उभे आहेत. यापैकी एजाझ आणि रचिन हे भारतीय वंशाचे असले तरी न्यूझीलंडचे खेळाडू आहेत. एजाझनं मुंबई टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये सर्व 10 विकेट्स घेत ऐतिहासिक कामगिरी केली. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात ही कामगिरी करणारा तो तिसराच बॉलर ठरला आहे. रचिन रविंद्रने या सीरिजमध्येच टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याला कानपूर टेस्टमध्ये एकही विकेट मिळाली नाही. पण एजाझसोबत 10 व्या विकेटसाठी चिवट संघर्ष करत त्यानं न्यूझीलंडचा पराभव टाळला होता. IND vs NZ: विराट कोहलीचं दमदार कमबॅक, सर्वात मोठ्या रेकॉर्ड्सह दिलं टीकाकारांना उत्तर अक्षर पटेलनं या वर्षी टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या पदार्पणापासूनच तो सातत्याने कामगिरी करत आहे. कानपूरमध्ये बॉलिंगनं कमाल करणाऱ्या अक्षरनं मुंबई टेस्ट बॅटींगने गाजवली. त्यानं या टेस्टमध्ये 52 आणि नाबाद 41 रन केले. रविंद्र जडेजा दुखापतीमुळे मुंबई टेस्ट खेळू शकला नाही. पण त्यानं कानपूर टेस्टमध्ये अर्धशतक झळकावले होते. दोन देशांसाठी खेळलेल्या या चार खेळाडूंचा खास स्टाईलनं अश्विननं एकत्र फोटो काढला आहे. अश्विनच्या या कल्पकतेमुळे हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
First published:

Tags: Axar patel, Cricket news, Photo viral, R ashwin, Ravindra jadeja

पुढील बातम्या