मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : पाच बॉलमध्ये बदललं नशीब, वॉशिंग्टन सुंदर ठरला दुर्दैवी

IND vs ENG : पाच बॉलमध्ये बदललं नशीब, वॉशिंग्टन सुंदर ठरला दुर्दैवी

 भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात अहमदाबादमध्ये सुरु असलेल्या चौथ्या टेस्टमध्ये चांगला खेळ करुनही वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) दुर्दैवी ठरला आहे

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात अहमदाबादमध्ये सुरु असलेल्या चौथ्या टेस्टमध्ये चांगला खेळ करुनही वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) दुर्दैवी ठरला आहे

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात अहमदाबादमध्ये सुरु असलेल्या चौथ्या टेस्टमध्ये चांगला खेळ करुनही वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) दुर्दैवी ठरला आहे

    अहमदाबाद, 6 मार्च : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात अहमदाबादमध्ये सुरु असलेल्या चौथ्या टेस्टमध्ये चांगला खेळ करुनही वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) दुर्दैवी ठरला आहे. भारताचे शेवटचे तीन बॅट्सन पाच बॉलमध्ये आऊट झाल्यानं सुंदरला टेस्ट करियरमधील पहिलं शतक झळकावता आले नाही. सुंदर अखेर 96 वर नाबाद राहिला. भारताची पहिली इनिंग 365 वर संपुष्टात आली. त्यामुळे टीम इंडियानं पहिल्या डावात 160 रनची आघाडी घेतली आहे. सुंदरनं बदललं चित्र अहमदाबाद टेस्टच्या दुसऱ्या दिवशी भारताची अवस्था 6 आऊट 146 अशी होती. त्यावेळी सुंदर बॅटींगला आला होता.  या नाजूक परिस्थितीमध्ये त्यानं सुरुवातीला ऋषभ पंतला (Rishabh Pant) समर्थ साथ दिली. या जोडीनं सातव्या विकेटसाठी 113 रनची भागिदारी केली. या  भागिदारीमुळे टीम इंडियाला पहिल्या इनिंगमध्ये आघाडी घेतली. पंत 101 रन काढून आऊट झाल्यानंतरही सुंदर थांबला नाही. सुंदरनं अक्षर पटेलसोबत (Axar Patel) भागिदारी करत भारताला मोठी आघाडी मिळवून दिली. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सुंदरनं टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्यानं सातत्यानं चांगली बॅटींग केली आहे. या मालिकेतील चेन्नईमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये त्यानं  नाबाद 85 रन केले होते. त्याचबरोबर ब्रिस्बेन टेस्टमध्ये 62 रन करत टीम इंडियाच्या विजयात मोलाचे योगदान दिले होते. सुंदर आणि अक्षर ही जोडी चौथ्या दिवशी आत्मविश्वासानं खेळत होती. त्यामुळे सुंदर शतक पूर्ण करणार असं वाटत होते. त्यावेळी अक्षर पटेल 43 रन काढून रन आऊट झाला. अक्षर आऊट झाल्यानंतर इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज हे शेवचचे दोन बॅट्समन एकही रन न काढता आऊट झाले. त्या दोघांना बेन स्टोक्सनं आऊट केलं. त्यामुळे सुंदरला पहिल्या शतकासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. India all out! Siraj is cleaned up by Stokes, and Sundar is stranded on 96*. India end the innings with a lead of 160! #INDvENG | https://t.co/6OuUwURcgX pic.twitter.com/TdhEttH3Jw — ICC (@ICC) March 6, 2021 ( वाचा : क्रिकेटमधील मोठा दिवस! आजच्याच दिवशी 50 वर्षांपूर्वी घडला होता इतिहास ) चार टेस्टच्या या मालिकेत भारताकडं 2-1 अशी आघाडी आहे. ही टेस्ट जिंकली किंवा ड्रॉ केली तरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (WTC) फायनलमध्ये टीम इंडिया प्रवेश करेल. तिसऱ्या टेस्टमध्ये पराभूत झाल्यानंतर इंग्लंडचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Axar patel, Ben stokes, Cricket, India vs england, IPL 2021, Washington sunder

    पुढील बातम्या