जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs ENG : विराट कोहली आणि अंपायरमध्ये ‘या’ कारणांमुळे दुसऱ्यांदा वाद, पाहा VIDEO

IND vs ENG : विराट कोहली आणि अंपायरमध्ये ‘या’ कारणांमुळे दुसऱ्यांदा वाद, पाहा VIDEO

IND vs ENG : विराट कोहली आणि अंपायरमध्ये ‘या’ कारणांमुळे दुसऱ्यांदा वाद, पाहा VIDEO

भारतीय खेळाडूंनी गाजवलेल्या तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या काही ओव्हर्समध्ये विराट कोहली चांगलाच रागावला होता. विराट इतका रागवला की त्यानं ऑन फिल्ड अंपायर नितीन मेनन (Nitin Menon) यांच्याशी वाद घातला.

  • -MIN READ
  • Last Updated :

चेन्नई, 16 फेब्रुवारी : चेन्नई टेस्टच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा दबदबा कायम होता. तिसऱ्या दिवशी आर. अश्विन आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी जबरदस्त बॅटिंग केली. अश्विननं टेस्ट करियमधील पाचवं शतक झळकावले. तर विराटनं अत्यंत अवघड परिस्थितीमध्ये 62 रनची खेळी केली. भारतीय खेळाडूंनी गाजवलेल्या तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या काही ओव्हर्समध्ये विराट कोहली चांगलाच रागावला होता. विराट इतका रागवला की त्यानं ऑन फिल्ड अंपायर नितीन मेनन (Nitin Menon) यांच्याशी वाद घातला. नेमकं काय घडलं? विराट कोहलीच्या रागाचं कारण तिसऱ्या अंपायरचा निर्णय होता. इंग्लंडच्या दुसऱ्या इनिंगमध्ये अक्षर पटेलनं (Axar Patel) टाकलेल्या बॉलवर जो रुट (Joe Root) कॅच आऊट असल्याचं अपिल भारतीय खेळाडूंनी केलं. अंपायरनं नॉट आऊट असल्याचा निर्णय घेतल्यावर विराट कोहलीनं DRS घेण्याचा निर्णय घेतला. (हे वाचा :  IND vs ENG : रोहित शर्मानं भर मैदानात लगावली ऋषभ पंतला थप्पड, पाहा VIDEO ) जो रुटच्या बॅटचा बॉलला स्पर्श झाला नसल्याचं तिसऱ्या अंपायरला रिप्लेमध्ये आढळलं. त्याच रिप्लेमध्ये रुट LBW आऊट असल्याचे दिसत होते. तिसऱ्या अंपायरनं LBW कडं दुर्लक्ष केलं आणि मैदानातल्या अंपायरचा निर्णय कायम ठेवत रुट ‘नॉट आऊट’ असल्याचं जाहीर केलं. थर्ड अंपायरच्या या निर्णयावर नाराज झालेला विराट कोहली तातडीनं मैदानातील अंपायर नितीन मेनन यांच्याकडं धावला. यावेळी या दोघांमध्ये 30 ते 40 सेकंद चर्चा झाली. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री देखील थर्ड अंपायरच्या निर्णयावर नाराज झाले होते.

जाहिरात

विराटच्या बॅटिंगवेळी देखील झाला होता वाद विराट कोहली आणि नितीन मेनन यांच्यात तिसऱ्या दिवशी झालेला हा पहिलाच वाद नव्हता. यापूर्वी विराट कोहली बॅटींग करतानाही या दोघांमध्ये वाद झाला होता. तिसाव्या ओव्हरमध्ये विराट कोहली यांनी रन काढल्यानंतर मेनन यांनी त्याला ताकीद दिली होती. विराटनं खेळपट्टीवरील प्रतिबंधित क्षेत्रातून रन काढल्याचं मेनन यांनी त्याला सांगितले. मेनन यांचा दावा विराटला पटला नाही. त्यामुळे काही काळ दोघांमध्ये वाद झाला होता.

चेन्नई टेस्ट भारताच्या मुठीत! तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने 3 आऊट 53 रन केले. जो रुट (Joe Root) 2 तर डॅनियल लॉरेन्स 19 रन काढून खेळत आहेत. या टेस्टचे आणखी दोन दिवस शिल्लक आहेत. इंग्लंडला विजयासाठी आणखी 429 रन करायचे आहेत. तर भारत विजयापासून फक्त 7 पावलं दूर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात