हेडिंग्ले, 25 ऑगस्ट: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरी टेस्ट (India vs England 3rd Test) लीड्सवरील हेडिंग्ले क्रिकेट मैदानात खेळली जाणार आहे. या सीरिजमध्ये टीम इंडिया सध्या 1-0 नं आघाडीवर आहे. लॉर्ड्समध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियानं इंग्लंडचा 151 रननं पराभव केला होता. पाचव्या दिवशी इंग्लंडची टीम 52 ओव्हरमध्येच ऑल आऊट झाली होती. भारतीय टीमला नॉटिंघममध्ये झालेली पहिली टेस्टही जिंकण्याची संधी होती. पण, त्या टेस्टच्या पाचव्या दिवशी पावसामुळे खेळ झाला नाही. त्यामुळे ती टेस्ट ड्रॉ झाली.
टीम इंडियाला लीड्स टेस्ट जिंकून ही आघाडी आणखी मजबूत करण्याची संधी आहे. मात्र यामध्ये हवामानाचा रोल मेन असेल. इंग्लंड दौऱ्यात आजवर पावसानं भारतीय टीमच्या प्रवासात अडथळा निर्माण केला आहे. साऊथम्पटनमध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्येही (WTC Final) पाऊस व्हिलन ठरला होता. त्यामुळे लीड्समध्ये हवामान कसं असेल हा टीम इंडियासमोरचा मुख्य प्रश्न आहे.
पहिल्या दिवशी हवामान कसं?
टीम इंडिया आणि क्रिकेट फॅन्ससाठी चांगली बातमी आहे. लीड्स टेस्टच्या पहिल्या दिवशी म्हणजेच बुधवारी खेळामध्ये पावसाचा अडथळा (Leeds Test Weather Report) येणार नाही. Accuweather.com च्या रिपोर्टनुसार पहिल्या दिवशी सुरुवातीला काही तास हवामान ढगाळ असेल. पण, पावसाची शक्यता खूप कमी आहे. दुपारनंतर लीा़ड्सवर ऊन पडेल. दिवसभर तापमान 16 ते 20 डिग्रीच्या दरम्यान असेल असा अंदाज आहे. दुपारनंतर हवेचा वेग 15 किलोमीटर पेक्षा जास्त असेल, त्यामुळे फास्ट बॉलर्सना मदत मिळण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया जाहीर, 3 नव्या खेळाडूंचा समावेश! वाचा संपूर्ण वेळापत्रक
असं असेल 5 दिवस हवामान
लीड्स टेस्टचे पुढील 4 दिवस देखील असेच हवामान असण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवस तापमान 18 ते 22 डिग्री असण्याची शक्यता आहे. सुरुवातीचे काही तास हवामान ढगाळ असेल, पण दुपारी ऊन पडेल. या काळात पावसाची शक्यता कमी आहे. त्यामुळे क्रिकेट फॅन्सना चांगली मॅच पाहायला मिळण्याची आशा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, India vs england