मुंबई, 25 ऑगस्ट: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट टीमची (IND-W vs AUS-W) घोषणा करण्यात आली आहे. पुढच्या महिन्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय टीम एक टेस्ट, तीन वन-डे आणि तीन टी20 सामने खेळणार आहे. भारतीय महिला टीम या दौऱ्यात पहिल्यांदाच डे-नाईट टेस्ट खेळणार आहे. त्यामुळे हा दौरा टीमसाठी खास आहे.
ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये तीन नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. मेघना सिंह, रेणुका सिंह ठाकूर आणि यस्तिका भाटिया यांचा टीममध्ये पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. तर बॅटर प्रिया पूनियाला वगळण्यात आलंय. प्रिया इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय टीमची सदस्य होती.
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वन-डे सीरिज 19 सप्टेंबर रोजी सुरु होईल. या दौऱ्यातील एकमेव टेस्ट 30 सप्टेंबरपासून खेळली जाणार आहे. तर 7 ऑक्टोबरपासून टी20 सीरिज सुरू होणार आहे.
#TeamIndia's T20I squad:
Harmanpreet Kaur (C), Smriti Mandhana (VC), Shafali, Jemimah, Deepti, Sneh Rana, Y Bhatia, Shikha Pandey, Meghna Singh, Pooja Vastrakar, R Gayakwad, Poonam Yadav, Richa Ghosh (WK), Harleen Deol, Arundhati Reddy, Radha Yadav, Renuka Singh Thakur#AUSvIND — BCCI Women (@BCCIWomen) August 24, 2021
IND vs ENG: दिग्गज बॉलर करणार इंग्लंडची शिकार, तिसऱ्या टेस्टपूर्वी विराटचा इशारा
IND-W vs AUS-W, ODI Series Schedule
पहिली वन-डे : 19 सप्टेंबर, नॉर्थ सिडनी ओव्हल
दुसरी वन-डे : 22 सप्टेंबर, जंक्शन ओव्हल, मेलबर्न
तिसरी वन-डे: 24 सप्टेंबर, जंक्शन ओव्हल, मेलबर्न
IND-W vs AUS-W, One-off Test
30 सप्टेंबरपासून - वाका,पर्थ
IND-W vs AUS-W, T20I Series Schedule
पहिली टी20 - 7 ऑक्टोबर, नॉर्थ सिडनी ओव्हल
दुसरी टी20 - 9 ऑक्टोबर, नॉर्थ सिडनी ओव्हल
तिसरी टी20 - 11 ऑक्टोबर, नॉर्थ सिडनी ओव्हल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news