जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs ENG : 'मॅचपूर्वी 'या' खेळाडूनं दिलेला सल्ला कामी आला', विराटने केला खुलासा

IND vs ENG : 'मॅचपूर्वी 'या' खेळाडूनं दिलेला सल्ला कामी आला', विराटने केला खुलासा

IND vs ENG : 'मॅचपूर्वी 'या' खेळाडूनं दिलेला सल्ला कामी आला', विराटने केला खुलासा

भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील दुसऱ्या टी20 मॅचमध्ये भारताने इंग्लंडचा 7 विकेट्सनं पराभव केला. या मॅचमध्ये कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) याने 73 रनची नाबाद खेळी केली.

  • -MIN READ
  • Last Updated :

अहमदाबाद, 15 मार्च : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील दुसऱ्या टी20 मॅचमध्ये भारताने इंग्लंडचा 7 विकेट्सनं पराभव केला. या मॅचमध्ये कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) याने 73 रनची नाबाद खेळी केली. पहिल्या मॅचमध्ये कोहली शून्यावर आऊट झाला होता. त्यामुळे त्याच्यावर अधिक दबाव होता. दुसऱ्या टी20 पूर्वी कोहलीनं दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज बॅट्समन एबी डीव्हिलियर्स (AB de Villiers) याचा सल्ला घेतला होता. हा सल्ला त्याच्या कामी आला आहे. स्वत: विराटनेच या गोष्टीचा खुलासा केला आहे. विजयानंतर विराटने सांगितले की, ‘मॅचपूर्वी माझं एबी डीव्हिलियर्सशी बोलणे झाले होते. त्याने मला फक्त बॉल पाहा आणि खेळ असा सल्ला दिला होता. मी तसेच केलं. अनुष्कादेखील इथं आहे. तीदेखील माझ्याबद्दल सतत विचार करत असते.’ भारतीय टीमच्या एकूण कामगिरीवर विराटने समाधान व्यक्त केले. ‘आम्ही एकूण सर्व विभागामध्ये चांगली कामगिरी केली. शेवटच्या पाच ओव्हर्समध्ये फक्त 34 रन दिले. सर्वच बॉलर्सनी चांगले प्रदर्शन केले. वॉशिंग्टन सुंदरने उजव्या हाताच्या बॅट्समनच्या विरुद्ध चांगली बॉलिंग केली, असे विराटने स्पष्ट केले. ( वाचा :  IND vs ENG : वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर विराटला ‘मतलबी’ व्हायची गरज, वॉनचा सल्ला  ) पहिलीच मॅच खेळणाऱ्या इशान किशनचे देखील विराटने यावेळी कौतुक केले. ‘इशानने स्पेशल इनिंग खेळली. आयपीएलमध्ये चांगल्या बॉलर्सविरुद्ध आक्रमक खेळल्याचा त्याला फायदा झाला. त्याने विचारपूर्वक बॅटींग केली. एकही बेजबाबदार फटका मारला नाही.’  हार्दिक पांड्या बद्दल विराटने सांगितले की, ‘तो एक जबरदस्त खेळाडू आहे. त्याची तुलना होऊ शकत नाही. त्याने प्रत्येक मॅचमध्ये तीन ते चार ओव्हर बॉलिंग करावी अशी आमची इच्छा आहे. येत्या सहा ते आठ महिन्यात तो तिन्ही फॉरमॅटमध्ये एक ऑलराऊंडर म्हणून स्वत:ला तयार करेल, असे त्याने वचन दिले आहे.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात