मुंबई, 16 जुलै : श्रीलंकेचा माजी कॅप्टन आणि प्रमुख बॅट्समन कुसल परेरा
(Kusal Perera) दुखापीमुळे भारताविरुद्ध होणाऱ्या मालिकेतून आऊट झाला आहे. परेरा इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या श्रीलंका टीमचा कॅप्टन होता. मात्र खेळाडू आणि क्रिकेट बोर्डात पगाराच्या मुद्यावरुन सुरू असलेल्या वादामुळे दासून शनाकाची
(Dasun Shanaka) कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कुसल परेरा भारताविरुद्धच्या सीरिजमध्ये खेळणार नाही, हे निश्चित असल्याचं वृत्त ‘इसपीएन क्रिकइन्फो’ नं दिलं आहे. त्याच्या दुखापतीबद्दल अधिक विस्तारानं माहिती देण्यात आली नसली तरी त्याला किमान सहा आठवडे क्रिकेट खेळता येणार नसल्याचं टीमच्या डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. परेराच्या कॅप्टनसीमध्ये श्रीलंकेनं बांगलादेश आणि इंग्लंड विरुद्धची मालिका गमावली होती. इंग्लंड दौऱ्यात तर श्रीलंकेला एकही विजय मिळवता आला नाही.
भारताची विरुद्ध वन-डे सीरिज सुरू श्रीलंकेच्या अडचणी सतत वाढत आहेत. श्रीलंकेचे प्रमुख खेळाडू आणि बोर्ड यांच्यात पगाराच्या मुद्द्यावर वाद सुरु आहे. या वादामुळे काही खेळाडू कँप सोडून गेले होते. माजी कॅप्टननं निवृत्त होण्याचा इशारा दिला. इंग्लंड दौऱ्याहून परतलेल्या सपोर्ट स्टाफमधील दोन जणांना कोरोनाची लागण झाल्यानं संपूर्ण मालिका पुढे ढकलावी लागली. त्यापाठोपाठ परेरा देखील दुखापतीमुळे मालिकेतून आऊट झाल्यानं श्रीलंकेला धक्का बसला आहे.
पंत, साहा नाही तर पहिल्या मॅचमध्ये ‘हा’ असेल टीम इंडियाचा विकेट किपर
कोण आहे शनाका?
श्रीलंकेच्या माध्यमांनी यापूर्वी दिलेल्या वृत्तानुसार ऑल राऊंडर दासून शनाकाला
(Dasun Shanaka) या सीरिजसाठी कॅप्टन करण्याचा निर्णय श्रीलंका क्रिकेट बोर्डानं घेतला आहे. शनाका हा नव्या करारपद्धतीवर स्वाक्षरी करणारा पहिला खेळाडू होता.
29 वर्षाचा शनाका आक्रमक बॅट्समन आणि फास्ट बॉलर आहे. शनाकाने यापूर्वी 2019 साली पाकिस्तान विरुद्ध झालेल्या 3 टी20 मॅचमध्ये कॅप्टनसी सांभाळली होती. ती मालिका श्रीलंकेनं 3-0 अशी जिंकली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.