चेन्नई, 16 फेब्रुवारी : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात चेन्नईमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्टवर टीम इंडियानं घट्ट पकड मिळवली आहे. आर. अश्विनच्या (R. Ashwin) सेंच्युरीमुळे टीम इंडियानं इंग्लंडसमोर 482 रनचं आव्हान ठेवलं. या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस इंग्लंडची अवस्था 3 आऊट 53 अशी झाली होती. चौथ्या दिवशी इंग्लंडला आणखी एक धक्का बसला. तिसऱ्या दिवशी नाबाद असलेल्या डॅन लॉरेन्सला अश्विननं आऊट केलं. अश्विनच्या बॉलिंगवर ऋषभ पंतनं त्याला चपळाईनं स्टंप आऊट केले. भारतीय टीम चांगलं खेळत असली तरी टीमला एक धक्का बसला आहे. टीमचा ओपनर शुभमन गिल (Shubman Gill) चौथ्या दिवशी फिल्डिंगला उतरला नाही. बीसीसीआयनं दिलेल्या माहितीनुसार गिलच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्याच्या हाताचं स्कॅन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गिल चौथ्या दिवशी फिल्डिंग करणार नाही.
शुभमन गिलनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय टीममध्ये पदार्पण केलं होतं. पहिल्याच दौऱ्यात गिलनं चांगली छाप पाडली. ब्रिस्बेन टेस्टमध्ये गिलनं केलेल्या 91 रनचा टीम इंडियाच्या विजयात मोठा वाटा होता. इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या टेस्टमध्येही गिलनं हाफ सेंच्युरी झळकावली होती. दुसऱ्या टेस्टमध्ये तो मोठा स्कोअर करु शकला नाही.त्यानं या टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये तर शून्यावर आऊट झाला. दुसऱ्या इनिंगमध्येही त्याला फक्त 14 रन करता आले. (हे वाचा : IND vs ENG : विराट कोहली आणि अंपायरमध्ये ‘या’ कारणांमुळे दुसऱ्यांदा वाद, पाहा VIDEO ) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल गाठण्यासाठी भारत आणि इंग्लंड या दोन्ही टीमना ही टेस्ट जिंकणे आवश्यक आहे. या मालिकेतील उर्वरित दोन टेस्ट अहमदाबादमध्ये होणार आहेत.