• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs ENG : मुंबईचे आधारस्तंभ होणार इंग्लंडला रवाना, जखमी खेळाडूंची घेणार जागा

IND vs ENG : मुंबईचे आधारस्तंभ होणार इंग्लंडला रवाना, जखमी खेळाडूंची घेणार जागा

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला (India vs England) सध्या दुखापतीचं ग्रहण लागले आहे. टीम मॅनेजमेंटनं तीन खेळाडूंची मागणी केली असून या सर्वांचे मुंबईशी (Mumbai) कनेक्शन आहे.

 • Share this:
  मुंबई, 24 जुलै : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला सध्या दुखापतीचं ग्रहण लागले आहे. शुभमन गिल (Shubman Gill), वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि आवेश खान (Avesh Khan) हे तीन जण दुखापतीमुळे आगामी टेस्ट सीरिजमधून आऊट झाले आहेत. आता त्यांच्या जागी मुंबई टीमचे आधारस्तंभ असलेल्या दोन खेळाडूंना इंग्लंडमध्ये पाठवण्याचा विचार बीसीसीआय (BCCI) करत आहे. इंग्लंड दौऱ्यात जखमी झालेल्या खेळाडूंपैकी शुभमन गिल हा ओपनिंग बॅट्समन आहे. सुंदर हा बॉलिंग ऑल राऊंडर असून आवेश खानची टीममध्ये बॅकअप फास्ट बॉलर म्हणून निवड झाली होती. हे तीघे दुखापतीमुळे आऊट झाल्यानं इंग्लंड दौऱ्यावरील टीम इंडियाच्या खेळाडूंची एकूण संख्या ही 21 झाली आहे. त्यामुळे टीम मॅनेजमेंटनं बदली खेळाडूंची मागणी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. टीम इंडियानं पृथ्वी शॉ (Prithvi Shaw), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि जयंत यादव (Jayant Yadav) या तिघांची मागणी केल्याची माहिती आहे. यापैकी पृथ्वी आणि सूर्यकुमार हे दोघे देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करतात. हे दोघेही सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर असून त्यांनी वन-डे मालिकेत चांगली कामगिरी केली आहे. शुभमन गिल जखमी झाल्यानंतर लगेच टीम इंडियानं पृथ्वी शॉची मागणी केली होती. त्यावेळी निवड समितीनं नकार दिला होता. आता जखमी खेळाडूंची संख्या वाढल्यानं निवड समितीला या मागणीवर पुन्हा एकदा विचार करावा लागेल. IND vs SL: राहुल द्रविडच्या 'त्या' निर्णयावर गावसकरांची टीका, म्हणाले... टीम मॅनेजमेंटनं मागणी केलेला तिसरा खेळाडू जयंत यादव हा हरयाणाचा आहे. मात्र तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सदस्य आहे. जयंत यादव हा उत्तम बॅटींगसाठीही ओळखला जातो. इंग्लंड विरुद्ध मुंबईमध्ये झालेल्या टेस्टमध्ये त्यानं शतक देखील झळकावलं आहे. जयंत टीम इंडियाकडून  4 टेस्ट खेळला असून 2017 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो शेवटची टेस्ट खेळला आहे. जयंत यादवच्या बॅटींग करण्याच्या क्षमतेमुळेच सुंदरच्या जागेवर टीम इंडियानं त्याची मागणी केली आहे. इंग्लंड दौऱ्यातील पाचही टेस्ट अजून बाकी आहेत. या कालावधीमध्ये  खेळाडूंना दुखापतीबरोबरच कोरोनाचाही धोका आहे. त्यामुळे बीसीसीआय त्यांना लवकरात लवकर इंग्लंडला पाठवण्याची शक्यता आहे.
  Published by:News18 Desk
  First published: