मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : 827 रन देखील पुरेसे नाहीत! पृथ्वीच्या जागी विराटनं दिली दिल्लीकराला संधी

IND vs ENG : 827 रन देखील पुरेसे नाहीत! पृथ्वीच्या जागी विराटनं दिली दिल्लीकराला संधी

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील वन-डे मालिकेसाठी (ODI Series) टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. विजय हजारे स्पर्धेत 827 रन काढून विक्रम करणाऱ्या पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) या मुंबईकर फलंदाजाकडं निवड समितीनं दुर्लक्ष केलं आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 19 मार्च : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील वन-डे मालिकेसाठी (ODI Series) टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. या भारतीय टीममध्ये मुंबईकरांचा बोलबाला आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma), श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यांच्यासह सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav)  टीम इंडियात निवड करण्यात आली आहे. त्याचवेळी नुकत्याच झालेल्या विजय हजारे स्पर्धेत 827 रन काढून विक्रम करणाऱ्या पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) या मुंबईकर फलंदाजाकडे निवड समितीनं दुर्लक्ष केलं आहे. विशेष म्हणजे खराब फॉर्ममुळे टीम इंडियाच्या अंतिम 11 मधील जागा गमावणारा दिल्लीकर शिखर धवनला (Shikhar Dhawan) पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.

विजय हजारे ट्रॉफीच्या एका मोसमात 800 रन करणारा पृथ्वी शॉ हा  पहिला खेळाडू बनला आहे. वयाच्या 21 व्या वर्षी पृथ्वी शॉने विक्रमाला गवसणी घातली. त्याने या स्पर्धेत 165.40 च्या सरासरीने आणि 138.29 च्या स्ट्राईक रेटने एकूण 827 रन केले.

पृथ्वी शॉचा फॉर्म गेल्या वर्षी हरपला होता. इंडियन प्रीमियर लीग (IPL 2020) आणि भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो फार कमाल करू शकला नव्हता. या खराब फॉर्ममुळे त्याला टीम इंडियामधून वगळण्यात आलं होतं. त्यानंतर देशांतर्ग स्पर्धेत त्याने स्वत: चा फॉर्म सिद्ध केला. या स्पर्धेत शॉने एक नाबाद द्विशतकासह तीन शतकं आणि एक अर्धशतकही केलं.

(हे वाचा : IND vs ENG : भारताच्या वन-डे टीमची घोषणा, चार मुंबईकरांचा टीम इंडियात समावेश)

पृथ्वी शॉ ने फक्त बॅटींग केली नाही तर अनुभवी श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांच्या अनुपस्थितीमध्ये मुंबई टीमचं नेतृत्व देखील केले. विजय हजारे स्पर्धेच्या बाद फेरीत पृथ्वीवर कॅप्टनसीची जबाबदारी आली होती. त्यावेळी त्याने स्वत: आघाडीवर राहून टीमचं नेतृत्व केले.

उत्तर प्रदेश विरुद्धच्या फायनलमध्ये तर पृथ्वी शॉ जखमी झाला होता. तरीही त्याने नंतर बॅटींगला येत कमाल केली. फायनलमध्ये त्याने 39 बॉलवर 10 फोर आणि 4 सिक्स लगावून 73 रन केले. पृथ्वीच्या या खेळीमुळेच मुंबईला विजय हजारे करंडक स्पर्धेत विजेतेपद मिळवता आले.

विजय हजारे स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या कृणाल पांड्या (Krunal Pandya) आणि प्रसिद्ध कृष्णा ( Prasidh Krishna) यांची वन-डे मालिकेसाठी भारतीय टीममध्ये निवड झाली आहे. त्याचवेळी 827 रन करुन नवा विक्रम करणाऱ्या  पृथ्वीकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले आहे.

First published:

Tags: Cricket, India vs england, IPL 2021, Prithvi Shaw, Sports, Vijay hazare trophy, Virat kohli