मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG: पिचला सतत नावं ठेवणाऱ्या मायकल वॉनचे अखेर डोळे उघडले, म्हणाला...

IND vs ENG: पिचला सतत नावं ठेवणाऱ्या मायकल वॉनचे अखेर डोळे उघडले, म्हणाला...

इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉन (Michael Vaughan) गेल्या काही दिवसांपासून अहमदाबादच्या पिचची सतत थट्टा करत होता. आता चौथ्या टेस्टमध्ये इंग्लंडची खराब सुरुवात झाल्यानंतर त्याचे डोळे उघडले आहेत.

  • Published by:  News18 Desk

मुंबई 4 मार्च :  तिसरी टेस्ट दोन दिवसांमध्ये हरलेल्या इंग्लंडची चौथ्या टेस्टमध्येही खराब सुरुवात झाली आहे. त्यांची निम्मी टीम टी ब्रेकपूर्वी आऊट झाली आहे. इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉन (Michael Vaughan) गेल्या काही दिवसांपासून अहमदाबादच्या पिचची सतत थट्टा करत होता. आता चौथ्या टेस्टमध्ये इंग्लंडची खराब सुरुवात झाल्यानंतर त्याचे डोळे उघडले आहेत.

बॅटींगसाठी अनुकूल असलेल्या या पिचवर इंग्लंडची अवस्था 3 आऊट 30 अशी झाली होती. त्यानंतर इंग्लंडनं खराब बॅटिंग केल्याचं वॉननं मान्य केलं आहे. वॉननं एक ट्विट करत जो रुटच्या (Joe Root) टीमवरील राग व्यक्त केला आहे. ‘मागच्या काही टेस्टपेक्षा कितीतरी अधिक पटीनं खराब बॅटींग. हे पिच मोठा स्कोअर करण्यासाठी अगदी योग्य आहे. कुठल्याही प्रकारचा स्पिन नाही. बॉल सरळ बॅटवर येत आहे. आजवरची सर्वात खराब बॅटींग,’ असं ट्विट वॉननं केलं आहे.

England’s batting so far worse than any of the last few Tests ... This Pitch is a perfect surface to get a big first innings score ... No spin ... Ball coming onto the Bat ... Very poor Batting so far ... #INDvENG

— Michael Vaughan (@MichaelVaughan) March 4, 2021

टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली. अक्षर पटेलनं (Axar Patel) 2 तर मोहम्मद सिराजनं (Mohammed Siraj) 1 विकेट घेत इंग्लंडला तीन झटपट धक्के दिले.

(हे वाचा- IND vs ENG : विराट आणि पंतच्या जाळ्यात सापडला इंग्लिश बॅट्समन, पाहा VIDEO )

टीम इंडियानं या टेस्टमध्ये एक बदल केला आहे. जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) जागी मोहम्मद सिराजचा (Mohammad Siraj) समावेश टीममध्ये करण्यात आला आहे. सिराज यापूर्वी देखील चेन्नईमध्ये बुमराहच्या अनुपस्थितीमध्ये दुसरी टेस्ट खेळला होता. इंग्लंडच्या टीममध्येही दोन बदल करण्यात आले आहेत. स्टुअर्ट ब्रॉड आणि जोफ्रा आर्चर यांच्या जागेवर डॉम बेस आणि डॅन लॉरेन्सचा समावेश करण्यात आला आहे.

First published:

Tags: Cricket, India vs england