अहमदाबाद, 4 मार्च : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील चार टेस्टच्या सीरिजमध्ये अक्षर पटेलनं (Axar Patel) सर्वांना प्रभावित केलं आहे. अक्षरनं दुसऱ्या टेस्टमध्ये 7 तर तिसऱ्या टेस्टमध्ये 11 विकेट्स घेतल्या होत्या. चौथ्या आणि शेवटच्या टेस्टमध्येही त्यानं तो फॉर्म कायम ठेवला आहे.
टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींगला आलेल्या इंग्लंडला अक्षरनं झटपट दोन धक्के दिले. पटेलनं ओपनर डॉम सिब्ली (Dom Sibley) याला फक्त दोन रनवर आऊट केलं. अक्षरनं त्याच्या पहिल्या ओव्हरमध्येच ही विकेट घेतली. त्यापाठोपाठ त्यानं इंग्लंडचा दुसरा ओपनर झॅक क्राऊली (Zak Crawley) याला देखील आऊट केले. क्राऊलीनं फक्त 9 रन काढले.
विराट आणि पंतचं श्रेय
अक्षर पटेलला मिळालेल्या दुसऱ्या विकेटचं श्रेय हे विकेट किपर ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) या दोघांचं जास्त आहे. त्यांनी चांगली बॉलिंग करणाऱ्या अक्षरचा उत्साह वाढवला आणि क्राऊलीवर दबाव टाकला.
क्राऊली आऊट होण्याच्या एक बॉलपूर्वी स्टंपच्या मागे उभ्या असलेल्या पंतनं ‘कुणाला तरी राग येतोय’ असा टोला क्राऊलीला लगावला. त्याचवेळी विराटनं या बॉलवर खराब शॉट येणार आहे, असं सहकाऱ्यांना सांगितलं. क्राऊलीचं या दोघांच्या बोलण्याकडं जास्त लक्ष होतं. त्यामुळे तो अक्षरच्या बॉलवर नीट खेळू शकला नाही. त्यानं एक खराब शॉट मारत मोहम्मद सिराजच्या हातामध्ये एक सोपा कॅच दिला.
Pant - "Someone is getting angry, Someone is getting angry"
Next ball crawley just threw is wicket😂#INDvsENG #RishabhPant pic.twitter.com/Q1QBtJksuO
— Trollmama_ (@Trollmama3) March 4, 2021
सिराजला मोठं यश
चौथ्या टेस्टमध्ये जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजचा समावेश करण्यात आला आहे. सिराजनं हा विश्वास सार्थ ठरवत पहिल्या सत्रामध्ये एक विकेट घेतली. त्यानं इंग्लंडचा कॅप्टन जो रुट (Joe Root) याला आऊट करत मोठं यश मिळवलं.
LBW! ☝️
Mohammed Siraj scalps his first wicket of the match. 👌👌#TeamIndia pick their third wicket. 👍👍
Joe Root is out for 5.@Paytm #INDvENG
Follow the match 👉 https://t.co/9KnAXjaKfb pic.twitter.com/mMVn1MUvti
— BCCI (@BCCI) March 4, 2021
त्यानंतर जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स यांनी पहिल्या सत्रामध्ये आणखी पडझड होऊ दिली नाही. पण लंचनंतर लगेच सिराजनं बेअरस्टोला आऊट करत इंग्लंडला मोठा धक्का दिला आहे.