मुंबई, 20 ऑगस्ट : इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अँडरसनचा (James Anderson) लॉर्ड्स टेस्टमध्ये भारतीय खेळाडूंशी वाद झाला होता. या प्रसंगानंतर दुसऱ्या टेस्टचं वातावरण चांगलंच तापलं होतं. आता या टेस्टनंतर अँडरसनचा एक जुना व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो टीम इंडियाचा स्पिनर बॉलर आर. अश्विनच्या (R. Ashwin) फोटोबाबत एक संतापजनक कृत्य केले होते. पाच टेस्टच्या या मालिकेत टीम इंडिया सध्या 1-0 नं आघाडीवर आहे. तिसरी टेस्ट मॅच 25 ऑगस्टपासून हेडिंग्लेमध्ये होणार आहे. आयपीएल 2019 (IPL 2019) दरम्यानचा हा व्हिडीओ आहे. या स्पर्धेत आर. अश्विननं इंग्लंडचा बॅट्समन जोस बटलरला मंकडिंग करत आऊट केले होते. अश्विनची ही कृती नियमानुसार होती. त्यामुळे अंपायरने बटरलला आऊट दिले होते. अँडरसन या प्रकरानंतर अश्विनवर संतापला होता. त्याने बीबीसीमधील एका कार्यक्रमात अश्विनच्या फोटोचे तुकडे केले होते. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर क्रिकेट फॅन्सनी अँडरसनवर खरमरीत टीका केली होती. अश्विननं या टेस्ट सीरिजमधील एकही टेस्ट अद्याप खेळलेली नाही.
अफगाणिस्तानचे क्रिकेट संकटात, T20 वर्ल्ड कप खेळण्याबाबत संभ्रम लॉर्ड्स टेस्टच्या तिसऱ्या दिवशीबुमराह आणि जेम्स अँडरसन यांच्यामध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर नव्या वादाला सुरुवात झाली. बुमराहने अँडरसनवर बाऊन्सरचा पाऊस पाडला. यातले काही बॉल अँडरसनच्या शरिरावरही लागले. अखेर मोहम्मद शमीने अँडरसनला बोल्ड केलं. आऊट झाल्यानंतर निराश झालेला अँडरसन भारतीय खेळाडूंना काहीतरी बोलला. यानंतर चौथ्या दिवशीही विराट आणि अँडरसन यांच्यात वाद झाले आणि पाचव्या दिवशीही हा पंगा सुरूच राहिला.