जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs ENG: विराटच्या विकेटनंतर केलेल्या सेलिब्रेशनचं अँडरसननं सांगितलं कारण, म्हणाला...

IND vs ENG: विराटच्या विकेटनंतर केलेल्या सेलिब्रेशनचं अँडरसननं सांगितलं कारण, म्हणाला...

IND vs ENG: विराटच्या विकेटनंतर केलेल्या सेलिब्रेशनचं अँडरसननं सांगितलं कारण, म्हणाला...

क्रिकेटच्या मैदानावर विराट कोहली (Virat Kohli) आणि जेम्स अँडरसन (James Anderson) यांच्यातील द्वंद्व प्रसिद्ध आहे. लीड्स टेस्टमध्ये विराटला आऊट केल्यानंतर अँडरसननं जोरदार सेलिब्रेशन केलं होतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

ओव्हल, 2 सप्टेंबर : क्रिकेटच्या मैदानावर विराट कोहली (Virat Kohli) आणि जेम्स अँडरसन (James Anderson) यांच्यातील द्वंद्व प्रसिद्ध आहे. 2014 च्या इंग्लंड दौऱ्यात अँडरसननं विराटला नामोहरम केलं होतं. त्यानंतर 2018 साली भारतीय कॅप्टननं वर्चस्व गाजवलं. त्यानंतर या सीरिजमध्ये अँडरसनच्या स्विंग बॉलिंगवर कोहली संघर्ष करत आहे. या सीरिजमध्ये अँडरसननं विराटला 2 वेळा आऊट केलं आहे. लीड्स टेस्टमध्ये विराटला आऊट केल्यानंतर अँडरसननं जोरदार सेलिब्रेशन केलं होतं. अँडरसननं ‘द टेलीग्राफ’ मध्ये लिहलेल्या कॉलममध्ये या सेलिब्रेशनचं कारण सांगितलं आहे. ‘लीड्स टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये विराटला आऊट केल्यानंतर मी भावुक झालो होतो. हे ट्रेंट ब्रिज सारखे होते. तो एक जबरदस्त बॅट्समन आणि कॅप्टन आहे. त्यामुळे त्याला आऊट करण्याचं महत्त्व काय आहे, हे त्याला दाखवण्याची माझी इच्छा होती.’ असं अँडरसन म्हणाला. तिसऱ्या टेस्टमध्ये काय रणनीती होती, याचाही अँडरसननं खुलासा केला आहे. ‘आमचं सर्वात मोठं लक्ष्य हे पार्टनरशिपमध्ये बॉलिंग करणे हे होतं. मी विराटला सुरुवातीला 12 बॉल टाकले. त्यापैकी 10 बॉल त्यानं सोडले. मी विराटला खेळण्यास भाग पाडावं अशी जो रूटची इच्छा होती. पण, त्याला गती मिळावी असं मला वाटत नव्हतं. T20 वर्ल्ड कपपूर्वी अफगाणिस्तान क्रिकेटबाबत तालिबानचा मोठा निर्णय विराटनं या सीरिजमधील 5 इनिंगमध्ये एका अर्धशतकासह फक्त 124 रन काढवे आहेत. 55 हा त्याचा सर्वोच्च स्कोअर आहे. त्यानं मागील दौऱ्यामध्ये (2018) पाच टेस्टच्या सीरिजमध्ये दोन शतकांसह 593 रन काढले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात