Home /News /sport /

T20 वर्ल्ड कपपूर्वी अफगाणिस्तान क्रिकेटबाबत तालिबानचा मोठा निर्णय

T20 वर्ल्ड कपपूर्वी अफगाणिस्तान क्रिकेटबाबत तालिबानचा मोठा निर्णय

अफगाणिस्तानमध्ये तालिबान (Taliban) राज परत आल्यानंतर तेथील क्रिकेटबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. आगामी टी20 वर्ल्ड कपपूर्वी (T20 World Cup 2021) क्रिकेटबाबत तालिबाननं एक मोठा निर्णय घेतला आहे.

    मुंबई, 2 सप्टेंबर : अफगाणिस्तानमध्ये तालिबान (Taliban) राज परत आल्यानंतर तेथील क्रिकेटबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. यापूर्वी 1996 ते 2001 या कालावधीमध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट होती. त्यावेळी अनेक खेळासह मनोरंजन कार्यक्रमांवर त्यांनी बंदी घातली होती. त्यावेळी स्टेडियमचा वापर हा सार्वजनिकपणे मृत्यू देण्यासाठी केला जात असे. या अनुभवामुळे 20 वर्षांनी तालिबान राजवट परतल्यावर क्रिकेटचं भवितव्य अंधकारमय असेल असं मत व्यक्त करण्यात येत होतं. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी (Afghanistan Cricket Board) तालिबानचं क्रिकेटला समर्थन आहे, असा सतत दावा करत आहेत. मात्र पाकिस्तान विरुद्धची सीरिज (Afghanistan vs Pakistan) स्थगित झाल्यानं त्यांच्या या दाव्यावर शंका व्यक्त केली जात होती. या सर्व पार्श्वभूमीवर तालिबाननं एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध नोव्हेंबर महिन्यात होणारी एकमेव टेस्ट खेळण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर पुढच्या महिन्यात सुरू होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) खेळण्यासही तालिबाननं परवानगी दिली आहे. तालिबानच्या राजवटीमध्येही आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच पूर्वीसारख्या होतील, असं अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हमीद शिनवारी (Hamid Shinwari) यांनी स्पष्ट केले आहे. असं आहे वेळापत्रक अफगाणिस्तानची टीम 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर रोजी होबार्टमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकमेव टेस्ट खेळणार आहे. ही मॅच मागच्या वर्षीच होणार होती. पण, कोरोना निर्बंधामुळे ती टेस्ट होऊ शकली नाही. ही ऑस्ट्रेलियात अफगाणिस्तानची होणारी पहिली मॅच असेल. IND vs ENG: इंग्लंडला अश्विनची धास्ती! ओव्हल टेस्टमध्ये वापरणार 'हे' डावपेच ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्यापूर्वी अफगाणिस्तानची टीम 17 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान यूएई आणि ओमानमध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तानची अंडर 19 टीम या महिन्याच्या शेवटी बांगलादेशचा दौरा करणार असल्याचंही शिनवारी यांनी स्पष्ट केलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Afghanistan, Cricket news, Taliban

    पुढील बातम्या