अहमदाबाद, 24 फेब्रुवारी : भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहलीची
(Virat Kohli) ‘रन मशिन’ अशी ओळख आहे. विराटनं त्याच्या क्रिकेट करियरमध्ये अनेक मोठे रेकॉर्ड केले आहेत. विराट एक चांगला बॅट्समन, चपळ फिल्डर आणि यशस्वी कॅप्टन आहे. त्याचबरोबर विराट बॉलिंग देखील करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने
(ICC) एक व्हिडीओ
(VIDEO) शेअर करुन विराटबाबत एक खास प्रश्न विचारला आहे.
काय आहे व्हिडीओ?
भारत आणि इंग्लंड
(IND vs ENG) यांच्यातील उर्वरित दोन टेस्ट अहमदाबादमध्ये होणार आहेत. अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवरील टीम इंडियाच्या प्रॅक्टीसचा हा व्हिडीओ आहे. तिसऱ्या टेस्टच्या पूर्वी भारताचा ऑफ स्पिनर आर. अश्विन आणि फास्ट बॉलर उमेश यादवने गुलाबी बॉलने
(Pink Ball) सराव केला. त्याचवेळी विराट कोहलीनंही बॉलिंगचा सराव केला. विराटच्या बॉलिंगचा व्हिडीओ आयसीसीनं त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम
(Instagram) अकाऊंटवरुन शेअर केला आहे.
आयसीसीने या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये प्रश्न विचारला आहे की, ‘असं कोणतं काम आहे जे विराट कोहली करु शकत नाही?’ अर्थात विराटनं पहिल्यांदा बॉलिंग केलेली नाही. यापूर्वी त्याने आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये देखील बॉलिंग केली आहे. विशेष म्हणजे क्रिकेटच्या सर्व प्रकारात त्यानं बॉलिंग केली आहे. विराटने वन-डे आणि टी-20 मध्ये मिळून एकूण आठ विकेट घेतल्या आहेत. मात्र टेस्ट क्रिकेटमध्ये त्याला अजून एकही विकेट मिळालेली नाही.
( वाचा :
IND vs ENG : इतिहास घडवण्यापासून अश्विन 6 पावलं दूर, हेडली-स्टेनला मागे टाकणार! )
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार टेस्टची मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. चेन्नईत झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडने भारताचा 227 रनने पराभव केला होता. त्यानंतर त्याच मैदानावर भारताने इंग्लंडला 317 रनने हरवत पहिल्या टेस्टमधील पराभवाची परतफेड केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.